आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज कशी पूर्ण कराल?

हे तुम्हाला आवश्यक असलेली रक्कम आणि गरज यावर अवलंबून असेल.

कर्ज घेणे तेव्हा गरजेचे आहे, जेव्हा तुम्हाला सर्वात लवकर पैशांची गरज असेल.

एफडी तोडायला किंवा प्रॉपर्टी विकायला वेळ लागू शकतो.

कर्जाचा व्याजदर एफडीच्या परताव्याच्या तुलनेत जास्त असल्यास एफडी तोडणे चांगले असेल.

प्रॉपर्टी विकणे हा सर्वात शेवटचा पर्याय असला पाहिजे. 

मात्र, ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता. 

आधी तुम्ही कर्ज घ्या, ते घेऊन तुमचे काम पूर्ण करा आणि नंतर प्रॉपर्टी विकून ते कर्ज फेडा. 

जर गरज फारच कमी असेल तर मालमत्ता विकणे शहाणपणाचे नाही.

याप्रकारे तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, योग्य तो पर्याय निवडू शकता.