Home /News /money /

बनावट हिरे आणि रत्नं गहाण ठेवून मेहुल चोक्सीने घेतलं 25 कोटींचे कर्ज, असा झाला खुलासा

बनावट हिरे आणि रत्नं गहाण ठेवून मेहुल चोक्सीने घेतलं 25 कोटींचे कर्ज, असा झाला खुलासा

मेहुल चोक्सीवर पीएनबीची 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तो भारतातून देश सोडून अँटिग्वाला पळून गेला. त्यानंतर तो बराच काळ तिथेच राहिला. मात्र, त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चोक्सी डॉमिनिकाला पळून गेला, तिथे त्याला पोलिसांनी अटक केली.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 3 मे : केंद्रीय तपास संस्थेनं (CBI) 13,500 कोटी रुपयांच्या PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीविरुद्ध (Mehul Choksi) आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मेहुल चोक्सीने हिरे आणि दागिने गहाण ठेवून IFCI कडून 25 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. सीबीआयने या प्रकरणी मेहुल चोक्सी, त्याची कंपनी गीतांजली जेम्स आणि सूरजमल लल्लू भाई अँड कंपनी, नरेंद्र झवेरी, प्रदीप सी शाह आणि श्रेणिक शाह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक, आयएफसीआयच्या तक्रारीवरून सीबीआयने ही कारवाई केली आहे. IFCI ने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, मेहुल चोक्सीने हिरे आणि दागिने गहाण ठेवून 25 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल कर्ज घेतलं होतं. तक्रारीनुसार, चार वेगवेगळ्या मूल्यांकनकर्त्यांनी दागिन्यांची किंमत 34-45 कोटी रुपये दिली होती. त्यानंतर आयएफसीआयने चोक्सीला कर्ज दिले. कंपनीने कर्जाची परतफेड केली नसताना, IFCI ने तारण ठेवलेले शेअर्स आणि दागिन्यांमधून भरपाई करण्यास सुरुवात केली. हे वाचा - सोनं खरं की खोटं? काही मिनिटात 'या' पद्धतीने करा चेक IFCI ने 20,60,054 तारण समभागांपैकी 6,48,822 शेअर्स विकून कंपनीने 4,07 कोटी रुपये वसूल केले. मात्र, एनएसडीएलने मेहुल चोक्सीचा क्लायंट आयडी ब्लॉक केल्यामुळे कंपनी उर्वरित शेअर्स विकू शकली नाही. यानंतर, जेव्हा IFCI ने तारण ठेवलेले सोने, हिरे आणि दागिन्यांसह कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं आढळून आलं की, त्यांचं मूल्य मूल्यांकनापेक्षा तब्बल 98 टकक्यांनी कमी आहे. तारण ठेवलेल्या दागिन्यांची आणि हिऱ्यांची किंमत 70 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं नुकत्याच केलेल्या मूल्यांकनातून समोर आलं आहे. हे वाचा - अक्षय तृतीयेला सोनं खरेदी केलं तर पुढील वर्षापर्यंत किती रिटर्न मिळेल? चेक करा ताज्या मूल्यांकनात असं दिसून आलं की, हिरे निकृष्ट दर्जाचे आणि प्रयोगशाळेत तयार केले गेलेले आहेत आणि तारण ठेवलेले हिरे देखील अस्सल नव्हते. 30 जून 2018 रोजी, IFCI ने कर्जाला अनुत्पादित मालमत्ता म्हणून घोषित केलं. याप्रकरणी सीबीआयने मूल्यांकन करणाऱ्या आरोपींच्या कोलकाता, मुंबईसह 8 ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने कागदपत्रंही जप्त केली आहेत.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: CBI, Diamond, Financial fraud

    पुढील बातम्या