Home /News /money /

अमेरिकन फॅशन ब्रँड GAP ची उत्पादने भारतात सहज मिळणार! Reliance Retail बनले अधिकृत रिटेलर

अमेरिकन फॅशन ब्रँड GAP ची उत्पादने भारतात सहज मिळणार! Reliance Retail बनले अधिकृत रिटेलर

भारतीयांना रिलायन्स रिटेलच्या (Reliance Retail) नेतृत्वाखालील खास ब्रँड स्टोअर्स, मल्टी-ब्रँड स्टोअर एक्सप्रेशन्स आणि डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये आता अमेरिकन फॅशन ब्रँड GAP ची नवनवीन उत्पादने मिळणार आहेत.

    मुंबई, 6 जुलै : उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मालकीचा भारतातील आघाडीचा उद्योग समुह रिलायन्स (Reliance Group) पुन्हा एकदा नवीन भरारी घेण्याच्या तयारीत आहे. रिलायन्सने आता अमेरिकन फॅशन ब्रँड भारतात आणणार असल्याची घोषणा केली आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेडने (Reliance Retail Ltd.) अमेरिकन फॅशन ब्रँड गॅप (GAP) भारतात आणण्यासाठी Gap Inc. सोबत दीर्घकालीन भागीदारी (long-term franchise agreement) केली आहे. दीर्घकालीन फ्रँचायझी कराराद्वारे, रिलायन्स रिटेल आता भारतातील सर्व चॅनेलवर गॅपसाठी अधिकृत रिटेलर बनले आहे. त्यामुळे आता अमेरिकन फॅशन ब्रँडची उत्पादने भारतात सहज उपलब्ध होतील. रिलायन्स इंडस्ट्री नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन गोष्टी घेऊन येत असते. आता तर प्रसिद्ध फॅशन ब्रँड 'गॅप'ची उत्पादने भारतात आणली जाणार आहे. रिलायन्स रिटेल विशेष ब्रँड स्टोअर्स, मल्टी-ब्रँड स्टोअर एक्सप्रेशन आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून GAP ची प्रसिद्ध फॅशन भारतीय ग्राहकांसाठी घेऊन येणार असल्याची माहिती कंपनीने एका निवेदनाद्वारे दिली आहे. या भागीदारीचा उद्देश GAP चा आघाडीचा कॅज्युअल लाईफस्टाईल ब्रँड आणि रिलायन्स रिटेलची मजबूत रिटेल साखळीद्वारे उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणे आहे, असं निवेदनात लिहलं आहे. काय आहे फॅशन ब्रँडची वैशिष्ट्ये? अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे 1969 मध्ये स्थापन झालेल्या GAP या फॅशन ब्रँडने डेनिमवर आधारलेल्या आपल्या उत्पादनांनी जगभरातील ग्राहकांना आकर्षित केलं आहे. कंपनीने आपलं दर्जेदार उत्पादन ऑनलाइन आणि कंपनी संचालित जागतिक स्तरावरील फ्रँचायझीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडलं आहे. हे एक अमेरिकन स्टाईल प्रोजेक्ट करते जी व्यक्ती, पिढ्या आणि संस्कृतींमधील अंतर कमी करण्यासाठी ओळखले जाते. कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करण्याआधी 'ही' केस वाचा अमेरिकन ब्रँड भारतात आणण्यासाठी आम्ही आनंदी : सीईओ अखिलेश प्रसाद "रिलायन्स रिटेलमध्ये, आमच्या ग्राहकांसाठी नवनवीन आणि सर्वोत्कृष्ट गोष्टी आणल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या फॅशन आणि लाईफस्टाईल पोर्टफोलिओमध्ये आयकॉनिक अमेरिकन ब्रँड, GAP चा आता समावेश होणार असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचा विश्वास आहे, की रिलायन्स आणि GAP आघाडीची फॅशन उत्पादने आणि अनुभव त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश ऐकमेकांना पूरक आहे,” असं रिलायन्स रिटेल लिमिटेडचे ​​फॅशन आणि लाईफस्टाईलचे सीईओ अखिलेश प्रसाद म्हणाले. त्याचवेळी रिलायन्ससारख्या कंपनीत सहभागी होऊन भारतात चांगली बाजारपेठ मिळवण्याचा गॅपला विश्वास आहे. या संदर्भात आंतरराष्ट्रीय ग्लोबल लायसन्सिंग आणि होलसेलचे व्यवस्थापकीय संचालक अँड्रिन गेर्नांड म्हणाले, की "आम्ही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये GAP व्यवसाय वाढविण्यास उत्सुक आहोत. भारतातील तळागाळात पोहचलेल्या रिलायन्स रिटेल सारख्या प्रादेशिक तज्ज्ञांसोबत भागीदारी केल्याने आम्हाला आमच्या व्यवसायाच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यास मदत झाली आहे. यामुळे जगभरातील ग्राहकांना आमचा ब्रँड वितरीत करण्याची संधी मिळाली आहे."
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Mukesh ambani, Reliance, Reliance group

    पुढील बातम्या