Home /News /money /

मुदतपूर्व कर्ज फेडण्याचे अनेक फायदे; कर्जातून मुक्त होण्यासाठी काय कराल?

मुदतपूर्व कर्ज फेडण्याचे अनेक फायदे; कर्जातून मुक्त होण्यासाठी काय कराल?

कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी तुम्ही फक्त परतफेड योजनेवर अवलंबून राहू शकत नाही. आपल्यासाठी योग्यरित्या बचत करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही जितकी जास्त बचत कराल तितक्या लवकर तुम्ही कर्जाची परतफेड करू शकाल.

    मुंबई, 1 जानेवारी : विविध गरजा भागवण्यासाठी लोक कर्ज (Loan) घेताच आणि आपले ध्येय पूर्ण करतात. कर्जाची वेळेवर परतफेड करणे ही तुमची जबाबदारी आहे. परंतु कर्जापासून (Debt Free)  लवकर सुटका होणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही कोणतीही चिंता न करता तुमच्या उत्पन्नाचा फायदा घेऊ शकता. महागडी कर्जे आधी संपवून टाका अशी काही कर्जे आहेत ज्यांची वेळेवर आणि लवकर परतफेड करणे आवश्यक आहे. म्हणूनच अशा कर्जांना प्राधान्य (Loan Priority) दिले पाहिजे. जसे क्रेडिट कार्ड कर्ज (Credit Card Loan). जर तुम्ही क्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड केली नाही, तर तुमच्यावर 30 ते 40 टक्के व्याज आकारले जाते. जे सर्वात महाग कर्जांपैकी एक आहे. तर गृहकर्जासारख्या इतर कर्जाचा व्याजदर तुमच्या खिशाला जड नसतो. म्हणून प्रथम एक योजना बनवा की तुमच्या सर्व कर्जांपैकी तुम्ही कोणत्या कर्जाला प्रथम प्राधान्य द्याल. PPF ते सुकन्या समृद्धी योजनेसह छोट्या बचत योजनांचे व्याजदर जैसे थे; काय आहेत सध्याचे व्याजदर? बचत करण्याची सवय लावा कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी तुम्ही फक्त परतफेड योजनेवर अवलंबून राहू शकत नाही. आपल्यासाठी योग्यरित्या बचत करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही जितकी जास्त बचत कराल तितक्या लवकर तुम्ही कर्जाची परतफेड करू शकाल. मुदतीआधी परतफेड मूळ रक्कम लवकर भरल्याने तुम्हाला कर्जातून लवकर बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. विशेषतः जेव्हा तुम्ही तुमच्या कर्जाच्या सुरुवातीच्या काळात असाल. समजा तुम्ही 9 टक्के दराने 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. तुमचा हफ्ता 26,034 रुपये आहे. 20 वर्षात तुम्हाला एकूण 32 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. परंतु जर तुम्ही तुमच्या 13व्या हप्त्याने 100,000 रुपये प्रीपे केले तर तुमचे एकूण व्याज 28.81 लाख रुपये होईल. म्हणजेच तुमची बचत सुमारे 3.67 लाख रुपये होती. GST कलेक्शन डिसेंबर 2021 मध्ये 1.29 लाख कोटींवर, नोव्हेंबरच्या तुलनेत घट EMI वाढवा तुम्ही कंपनीला तुमचा EMI वाढवण्यासही सांगू शकता. आगामी काळात तुमचा पगार वाढल्याने तुमची कर्ज फेडण्याची क्षमताही वाढते. अशा परिस्थितीत कर्जातून त्वरीत मुक्त होण्यासाठी, आपण कंपनीकडे अशी विनंती करू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Loan, Money

    पुढील बातम्या