न्यूयॉर्क, 31 डिसेंबर: अमेरिकेतील (America) ग्राहम स्टीफन नावाच्या तरुणाचं (Graham Stephan) नशीब एका वर्षात पूर्णपणे पालटून गेलं. याला काऱणीभूत ठरला त्याचा एक मोठा निर्णय. हा निर्णय़ होता स्वतःचं यूट्यूब चॅनेल (YouTube Channel) सुरू करण्याचा. आपल्या आवडीच्या विषयातलं चॅनेल त्याने सुरू केलं आणि त्याच्यावर नियमितपणे पोस्ट टाकायला प्रारंभ केला. बघता बघता त्याला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला आणि एक वर्षात कमालच झाली. अशी झाली सुरुवात या तरुणाचं नाव आहे ग्राहम स्टीफन. वयाच्या केवळ तेराव्या वर्षी त्याने अक्वॅरियम सेलर म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. पुढची तीन वर्षं तिथं काम केलं आणि मग एक रॉक बँड ड्रमर म्हणून तो काम करू लागला आणि 2008 मध्ये त्याने एक रिअल इस्टेट एजंट म्हणून कामाला सुुरुवात केली. यू****ट्यूबने बदललं नशीब वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव असलेल्या ग्राहमनं 2016 साली एक यूट्यूब चॅनेल सुरू केलं. या चॅनेलवर तो पर्सनल फायनान्स, रिअल इस्टेट आणि गुंतवणूक यासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट करत होता. त्यामुळे त्याचं नशीब बदलायला सुरुवात झाली. 2017 साली तो इतर जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाला आणि पूर्णवेळ यूट्यूबर म्हणून काम करणं सुरू केलं. त्याच वर्षी त्याने यूट्यूबमधून तब्बल 19 लाख रुपयांची कमाई केली.
चालवतो दोन चॅनेल ग्राहमचे सध्या दोन यूट्यूब चॅनेल आहेत. त्या दोन्ही चॅनेलमधून त्याची घसघशीत कमाई होते. त्याच्या कमाईचे मुख्य स्त्रोत आहेत. YouTube जाहीराती ऑनलाईन कोर्सेस रियल इस्टेट एजंट स्पॉन्सर्स अमेझॉनच्या सहकारी संस्थांकडून कमाई कंपन्यांचा सल्लागार म्हणून काम करण्याची कमाई हे वाचा- RBI चे लेटर दाखवून बंटी-बबलीने लोकांना लुटले, मनसेनं पकडून दिला ‘खळ्ळ-खट्याक’ सध्या यूट्यूबवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने आपली सर्व कामं बाजूला ठेवली आहेत. या क्षेत्रात एक उत्तम करिअर घडू शकतं, याची प्रतिमी ग्राहमच्या प्रवासातून येते.