Mahila Samman Certificate Scheme: यंदाच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी स्पेशल डिपॉझिट स्किम महिला सन्मान बचत प्रमाणपत्र लॉन्च करण्याची घोषणा केली होती. ही स्किम 1 एप्रिल 2023 रोजी सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत गेल्या तीन महिन्यांत आतापर्यंत 10 लाखांहून अधिक महिलांनी गुंतवणूक केली आहे. आता बँकांमध्येही सुरु करता येणार स्किम आतापर्यंत, 1.026 मिलियन महिला गुंतवणूकदारांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत एकूण 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. येत्या काही दिवसांत या योजनेतील गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे कारण सरकारने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि निवडक खाजगी बँकांना त्यांच्या शाखांमध्ये योजना आणण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या योजनेतील गुंतवणूक पोस्ट ऑफिसमधूनच केली जात होती. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, ICICI बँक, HDFC बँक आणि IDBI बँकेसह सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ही योजना चालवण्यास सांगितले आहे. Gold News: भारतीय महिलांकडे आहे तुफान सोनं! एवढं सोनं जगातील टॉप 5 बँकांकडेही नाही किती व्याज मिळतं? योजनेनुसार, महिलांसाठीच्या या दोन वर्षांच्या डिपॉझिट स्किममध्ये गुंतवणुकीवर वार्षिक 7.5 टक्के व्याज दिले जाईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत फक्त महिलाच अकाउंट उघडू शकतात. यासोबतच अल्पवयीन मुलीच्या नावाने तिचे पालक अकाउंट उघडू शकतात. या योजनेत 31 मार्च 2025 पर्यंत महिला किंवा अल्पवयीन मुलीच्या नावाने खाते उघडता येईल. व्याज कधी मिळणार? महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या अकाउंटमध्ये 1,000 ते 2 लाख रुपयांपर्यंतचे डिपॉझिट केले जाऊ शकतात. गुंतवणूकदारांना वार्षिक 7.5 टक्के व्याज दिले जाईल आणि व्याजाची रक्कम प्रत्येक तिमाहीनंतर अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाईल. स्किमच्या मॅच्योरिटीनंतर अकाउंट होल्डर फॉर्म-2 भरून पैसे काढू शकतात. योजनेच्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही अकाउंट होल्डरकडे 40 टक्के रक्कम काढण्याचा पर्याय आहे. SBI WeCare: ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडन्यूज! एसबीआयने वाढवली स्पेशल एफडी स्किमची डेडलाइन CBDT च्या नोटिफिकेशनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज 40,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल तर त्यावर TDS भरावा लागणार नाही. मात्र, या योजनेत गुंतवणूक केल्यावर मिळणारे व्याज खातेदाराच्या उत्पन्नात जोडले जाईल आणि टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागेल. सीबीडीटीने यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.