Home /News /money /

LPG Cylinder Price: सामान्यांच्या खिशाला चाप, आजपासून महागला घरगुती गॅस सिलेंडर

LPG Cylinder Price: सामान्यांच्या खिशाला चाप, आजपासून महागला घरगुती गॅस सिलेंडर

देशातील वाढत्या महागाईमुळे सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे.

    नवी दिल्ली, 02 डिसेंबर: देशातील वाढत्या महागाईमुळे सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस (Cooking Gas) सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. CNBC आवाजला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार आजपासून तुमच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती 2 डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅसच्या किंमती 644 रुपये झाली आहे. 1 डिसेंबर रोजी तेल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शिअल गॅसच्या किंमतीत वाढ केली होती. 19 किलोच्या या LPG गॅस सिलेंडरची किंमत 55 रुपयांनी वाढवण्यात आली होती. CNBC आवाजचे प्रतिनिधी असीम मनचंदा यांना मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीकरांना आता गॅस सिलेंडरसाठी 644 रुपये मोजावे लागणार आहेत. LPGच्या किंमतीत जुलैमध्ये झाली होती शेवटची वाढ याआधी जुलै 2020 महिन्यात 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरची किंमत साधारण 4 रुपयांपर्यंत वाढली होती. जून महिन्यात दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या एलपीजी सिलेंडरची किंमत 11.50 रुपयांनी वाढली होती. मे मध्ये एलपीजी 162.50 रुपयांपर्यंत स्वस्त झाला होता. कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढल्या डिसेंबर महिन्यात 19 किलोग्रॅम कमर्शिअर गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये सर्वाधिक 56 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. याठिकाणी कमर्शिअल गॅस सिलेंडरसाठी 1410 रुपये द्यावे लागतील. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 55 रुपयांची वाढ होऊन 19 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत 1296 रुपये आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये देखील 55 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर दोन्ही शहरात अनुक्रमे किंमती 1351 रुपये आणि 1244 रुपये आहेत. कसे तपासाल LPG गॅस सिलेंडरचे नवे दर घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर तपासण्यासाठी तुम्ही सरकारी तेल विपणन कंपनीच्या वेबसाइटवर जाऊ शकता. याठिकाणी कंपनीकडून दर महिन्याचे रेट्स जारी केले जातात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर जाऊन तुम्ही तुमच्या शहरातील दाम तपासू शकता. कसे निश्चित होतात घरगुती गॅस सिलेंडरचे दर एलपीजी सिलेंडरच्या किंमती सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क दर आणि परकीय चलन विनिमय दरानुसार निश्चित केल्या जातात. यामुळे, दरमहा एलपीजी सिलेंडरच्या सबसिडीची रक्कमही बदलते. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढतात तेव्हा सरकार अधिक अनुदान देते आणि दर खाली आल्यावर अनुदान कमी केले जाते. कराच्या नियमांनुसार, एलपीजीवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) इंधनाच्या बाजारभावानुसार मोजला जातो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gas, Money

    पुढील बातम्या