मराठी बातम्या /बातम्या /मनी /महागाईचा आणखी एक फटका, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ

महागाईचा आणखी एक फटका, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ

आज शनिवारी 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरचे दर (LPG Gas Cylinder Price Hike) वाढले आहेत. ही वाढ आज शनिवार 7 मे 2022 पासून लागू करण्यात आली आहे.

आज शनिवारी 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरचे दर (LPG Gas Cylinder Price Hike) वाढले आहेत. ही वाढ आज शनिवार 7 मे 2022 पासून लागू करण्यात आली आहे.

आज शनिवारी 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरचे दर (LPG Gas Cylinder Price Hike) वाढले आहेत. ही वाढ आज शनिवार 7 मे 2022 पासून लागू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 7 मे : पेट्रोल-डिझेल, खाण्यापिण्याच्या, वापरायच्या अनेक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. असं असताना आता सर्वसामान्यांना आणखी एक फटका बसणार आहे. आज शनिवारी 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरचे दर (LPG Gas Cylinder Price Hike) वाढले आहेत. घरगुती LPG Gas Cylinder च्या किमतीत 50 रुपये प्रति सिलेंडर वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आज शनिवार 7 मे 2022 पासून लागू करण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीत 14.2 किलोग्रॅम डॉमेस्टिक LPG सिलेंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. मागील वेळी 22 मार्च रोजी घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपये वाढ झाली होती. तर एप्रिलमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती.

एका आठवड्यापूर्वी 1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर वाढवले होते. त्यावेळी प्रति सिलेंडर 102.50 रुपये किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्याशिवाय त्याआधी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती. नव्या किमती लागू झाल्यानंतर दिल्लीत 1 मेपासून 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती 2253 रुपयांवरुन 2355.50 रुपये झाल्या.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था बाहेर येत आहे. यासोबतच जगभरात उर्जेची मागणी वाढते आहे. परंतु मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नसल्याने गॅसच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

हे वाचा - पेट्रोल, गॅस आणि आता रेपो रेट.. थेट संबंध नसला तरी सामान्य माणसालाच बसणार सर्वाधिक झळ

तुमच्या शहरातील गॅसचे दर असे जाणून घ्या -

तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्याविषयी माहिती घेऊ शकता. घरगुती गॅस सिलेंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावं लागेल. इथे कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. यासाठी तुम्हाला https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करावं लागेल. दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे नवे दर (Price) जाहीर केले जातात.

First published:
top videos

    Tags: Gas, LPG Price, Price hike