जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LPG Booking: घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर मिळतोय निश्चित डिस्काउंट, असा मिळेल फायदा

LPG Booking: घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर मिळतोय निश्चित डिस्काउंट, असा मिळेल फायदा

LPG Booking: घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर मिळतोय निश्चित डिस्काउंट, असा मिळेल फायदा

डिजीटल पेमेंटची सुविधा देणाऱ्या बजाज फिनसर्व App (Bajaj Finserv App) द्वारे एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगवर निश्चित डिस्काउंट (Discount Offer) मिळतो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : गॅस सिलेंडर बुक करत (LPG Cylinder Booking) असाल, तर एका चांगल्या ऑफरचा फायदा घेऊ शकता. डिजीटल पेमेंटची सुविधा देणाऱ्या बजाज फिनसर्व App (Bajaj Finserv App) द्वारे एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगवर निश्चित डिस्काउंट (Discount Offer) मिळतो आहे. Bajaj Finserv App द्वारे ग्राहक गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर 10 टक्के अधिकाधिक 75 रुपये डिस्काउंट मिळवू शकतात. हे App बजाज फायनान्स लिमिटेडचं (Bajaj Finance Limited) आहे. ऑफरचा फायदा घेण्यासाठी बजाज फिनसर्व App द्वारे गॅस बुकिंग करताना ग्राहकांना प्रोमोकोड GAS75 वापरावा लागेल.

हे वाचा -  Paytm Offer! मोफत LPG Cylinder मिळवण्याची संधी, पाहा काय आहे प्रोसेस

असा मिळेल कॅशबॅक - - सर्वात आधी Bajaj Finserv App ओपन करा. - आता Bills and Recharge सेक्शनमध्ये View All वर क्लिक करा. - आता Utilities and Bill मध्ये LPG GAS CYLINDER चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. - आता तुमचा गॅस सर्विस प्रोवाइडर निवडा. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा कंज्यूमर नंबर टाकावा लागेल. - तुमची बुकिंग रक्कम सिस्टमद्वारा सांगितली जाईल. - आता Proceed To Pay वर क्लिक करा. - आता Apply Promo Code च्या जागी GAS75 टाका. बुकिंग अमाउंटवर 10 टक्के सूट मिळेल. - सध्या दिल्लीत 14.5 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे. GAS75 हा प्रोमोकोड लावल्यानंतर तुम्हाला गॅस बुकिंगसाठी 824.50 रुपये पेमेंट करावं लागेल. पेमेंट मोड रुपात तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग, बजाज फिनसर्व वॉलेट किंवा यूपीआयचा वापर करू शकता.

हे वाचा -  Saving Account वर मिळतंय 7 टक्क्यांपर्यंत व्याज, कोणत्या बँकांमध्ये किती व्याजदर

दरम्यान, पेटेएमनेही (Paytm) आपल्या युजर्ससाठी एलपीजी सिलेंडर (LPG Gas Cylinder) बुकिंगवर एक जबरदस्त डील ऑफर केली आहे. एका ऑफरअंतर्गत तुम्ही 25 रुपयांची सूट मिळवू शकता तर दुसऱ्या ऑफरमध्ये 30 रुपये पेटीएम कॅशबॅक मिळवू शकता. त्याशिवाय आणखी एक तिसरी ऑफर आहे. यात तुम्ही मोफत घरगुती सिलेंडर मिळवू शकता, म्हणजेच या ऑफरमध्ये एकही रुपया न देता सिलेंडर (Free LPG Cylinder) मिळवता येईल. ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंतच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात