Home /News /money /

Online व्यवहार करताय? मग Cyber Insurance विषयी माहितीच पाहिजे

Online व्यवहार करताय? मग Cyber Insurance विषयी माहितीच पाहिजे

प्रत्येक क्षेत्रात डिजिटल व्यवहार (Digital Transactions) आणि इंटरनेटचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांमध्येही (cyber crimes) वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार (Cyber Criminal) लोकांचे आर्थिक नुकसान तर करत आहेतच शिवाय लोकांची प्रतिमा मलिनही करत आहेत. सायबर गुन्ह्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई सायबर विमा (Cyber Insurance) करते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 मे : देशात डिजिटल व्यवहार (Digital Transactions) आणि सोशल मीडियाचा (Social Media) वापर झपाट्याने वाढला आहे. यामुळे आर्थिक आणि वैयक्तिक माहिती लीक होण्याचा आणि आर्थिक फसवणूक होण्याचा धोकाही वाढला आहे. अशा फसवणुकीच्या प्रकाराबाबत आपण रोजच ऐकत असतो. या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना (cyber crime) प्रतिबंध करण्यासाठी सायबर इन्शुरन्स (Cyber Insurance) तुम्हाला खूप मदत करतो. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर विमा पॉलिसी (Cyber Insurance Policy) आज खूप महत्त्वाची झाली आहे. अशा पॉलिसीमध्ये, पॉलिसी धारकास विविध प्रकारचे सायबर गुन्हे आणि फसवणुकीपासून संरक्षण दिले जाते. जर कोणी तुमची रक्त आणि घामाची कमाई ऑनलाइन हिसकावून घेतली किंवा तुमचे बँक खाते, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा तुमच्या ई-वॉलेटमधून (e-wallet) फसवणूक करून ऑनलाइन खरेदी (Online Shopping) केली, तर विमा कंपनी त्याची भरपाई करेल. जर कोणी फिशिंग आणि ईमेल स्पूफिंगचा बळी बनून तुमचे पैसे चोरले, तर विमा कंपनी तुम्हाला या सायबर क्राईममुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देखील करते. देशातील अनेक विमा कंपन्या सायबर विमा करतात. बजाज अलियान्झ (Bajaj Allianz)  कंपनी एक लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंतचा सायबर विमा करते. कंपनीचा एक वर्षाचा विमा 700 पेक्षा कमी मासिक प्रीमियमसह सुरू होतो. त्याचप्रमाणे एचडीएफसी एर्गो (HDFC Ergo) देखील सायबर विमा देते. Post Office च्या' या' तीन योजनांमध्ये पैसे गुंतवा आणि जमवा मोठी रक्कम सायबर विमा काढताना या गोष्टी लक्षात ठेवा सायबर इन्शुरन्स घेताना कंपनीने दिलेली योजना नीट समजून घेतली पाहिजे. पॉलिसीमध्ये काय समाविष्ट आहे हे तुम्हाला माहित असले पाहिजे. सामान्यतः, सायबर विमा पॉलिसी 10 ते 15 प्रकारच्या सायबर धोक्यांपासून संरक्षण प्रदान करतात. आवश्यकतेनुसार मर्यादा तुमची सायबर सुरक्षा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन विमा संरक्षणाची मर्यादा निवडली पाहिजे. जर तुम्ही खूप ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुम्हाला जास्त मर्यादा लागेल. विमा कंपन्या रु. 50,000 ते रु. 1 कोटी पर्यंत कव्हरेज देतात. कमी प्रीमियमसाठी बळी पडू नका अनेक कंपन्या वजावटीच्या अटी लादतात. यामध्ये पॉलिसीधारकाला झालेल्या नुकसानीची भरपाई स्वतः करावी लागते आणि त्यानंतर विमा कंपन्या पैसे देतात. बर्‍याच कंपन्यांचे प्रीमियम कमी असतात, परंतु वजावट जास्त असते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागला तरी वजावट कमी ठेवावी.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Cyber crime, Digital services

    पुढील बातम्या