निवडणूक निकालानंतर आता 'हे' शेअर्स वधारणार, भरपूर पैसे मिळवण्याची संधी

लोकसभा निवडणूक निकालांनंतर सेन्सेक्स, निफ्टी नव्या उंचीवर पोचलेत. त्यामुळे आता सर्वसाधारण गुंतवणूकदारांकडे चांगल्या कमाईची संधी आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 10:41 PM IST

निवडणूक निकालानंतर आता 'हे' शेअर्स वधारणार, भरपूर पैसे मिळवण्याची संधी

मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणूक निकालांनंतर सेन्सेक्स, निफ्टी नव्या उंचीवर पोचलेत. त्यामुळे आता सर्वसाधारण गुंतवणूकदारांकडे चांगल्या कमाईची संधी आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपची सत्ता पुन्हा आल्यानं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तेजी येणार. कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग मटेरियल कंपनींचे शेअर्स वधारण्याची शक्यता आहे. खाजगी क्षेत्रातल्या काॅर्पोरेट बँक आणि स्पेशॅलिटी केमिकल कंपनींमध्ये गुंतवणूकदार रस घेतायत.

नेहरु, इंदिरा गांधींना जमले नाही, मोदींनी केला हा विक्रम!


एलारा कॅपिटलचे रिसर्च हेड धीरेंद्र तिवारी यांच्या म्हणण्याप्रमाणे कॅपिटल एक्सपेंडिचरशी संबंधित क्षेत्रांमध्ये कॅपिटल गुड्स, काॅर्पोरेट बँक आणि निवडक एनबीएफसीवर सगळ्यांचं लक्ष आहे.

राज ठाकरे व्हिडिओ प्ले झालाच नाही, 'असा' फ्लॉप झाला मनसे फॅक्टर


पैसे मिळवण्याची संधी

Loading...

तज्ज्ञांच्या मते महिंद्रा अँड महिंद्रा एसबीआय, कोलगेट, एचडीएफसी बँक, आरबीएल बँक, बाटा इंडिया, मारुती सुझुकी, अरबिंदो फार्मा, एलअँडटी, ICICI बँक, अल्ट्राटेक सीमेंट आणि ब्रिटानिया इंडस्ट्री यांचे शेअर्स वधारण्याची शक्यता आहे. या शेअर्समध्ये तुम्ही पैसे लावू शकता.

लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवाची ही आहेत 8 मोठी कारणं


ब्रोकरेज फर्म जेएम फायनॅन्शियलचे रिसर्च हेड सुहास हरिनारायण यांनी सांगितलं की, आम्ही खासगी क्षेत्रातल्या बँका, एनबीएफसी, इंडस्ट्रियल सायक्लिकल स्टाॅक्स यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. आयटीवर मात्र न्यूट्रल राहण्याचा सल्ला दिलाय. रुपया मजबूत होऊ शकतो, त्यामुळे आयटी सेक्टर अंडर-परफाॅर्म करेल.


VIDEO : जुनी जखम भरून निघाली, सुजय विखेंचा पवारांना सणसणीत टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 10:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...