Home /News /money /

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची ग्राहकसंख्या पाच कोटींच्या पार; देशातील वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल पेमेंट बँकेपैकी एक बँक ठरली

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची ग्राहकसंख्या पाच कोटींच्या पार; देशातील वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल पेमेंट बँकेपैकी एक बँक ठरली

India Post Payment बँकेच्या एकूण खातेदारांपैकी सुमारे 48% महिला खातेदार आहेत, तर 52% पुरुष खातेदार आहेत, ही आकडेवारी, अधिकाधिक महिलांना बँकिंग क्षेत्रात आणण्याचा बँकेचा उद्देश स्पष्ट करणारी आहे. महिलांच्या एकूण खात्यांपैकी 98% खाती त्यांच्या घरी जाऊन उघडण्यात आली आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 18 जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा (India Post Payment Bank) शुभारंभ करताना म्हटलं होते, की देशात वित्तीय समावेशन करण्यासाठीचा हा सर्वात मोठा उपक्रम आहे. त्या पोस्ट पेमेंट बँक या प्रथम डिजिटल बँकेने दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाच्या व्याप्तीचा उत्तम वापर करत त्या पायावर आपला विस्तार करत, एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांची संख्या पाच कोटींवर पोहोचली आहे, अशी घोषणा आज बँकेने केली. बँकेचा शुभारंभ झाल्यापासून, केवळ तीन वर्षांच्या आत ही देशातील सर्वाधिक जलद गतीने विस्तारलेल्या बँकांपैकी एक बँक ठरली आहे. आयपीपीबीने आपल्या 1.36 लाख पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून पाच कोटी खाती डिजिटल आणि संपूर्ण कागदरहित व्यवहार करत सुरु केली आहेत. यापैकी 1.20 लाख खाती ग्रामीण भागातली आहेत. तसेच, 1.47 लाख ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांना बँकिंग सेवा (Banking Service) देण्यात आल्या आहेत. Jio, Vi, Airtel चे 'हे' प्रीपेड प्लॅनमध्ये मिळतायेत Data आणि Calling सोबत अनेक बेनिफिट्स या कामगिरीमुळे, आयपीपीबीने जगातील सर्वात मोठी डिजिटल वित्तीय साक्षरता मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली असून, टपाल कार्यालयाच्या 2,80,000 कर्मचाऱ्यांच्या परिश्रम शक्तीच्या बळावर, वित्तीय साक्षरता आणि सक्षमीकरणाची मोहीम राबवली आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या एकूण खातेदारांपैकी सुमारे 48% महिला खातेदार आहेत, तर 52% पुरुष खातेदार आहेत, ही आकडेवारी, अधिकाधिक महिलांना बँकिंग क्षेत्रात आणण्याचा बँकेचा उद्देश स्पष्ट करणारी आहे. महिलांच्या एकूण खात्यांपैकी 98% खाती त्यांच्या घरी जाऊन उघडण्यात आली आहेत. आणि 68% महिलांना या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरणाचे लाभ मिळत आहेत. आणखी एक मैलाचा दगड म्हणजे देशातील युवक देखील पोस्ट पेमेंट बँकेकडे आकर्षित झाले आहेत. 41% पेक्षा अधिक खातेधारक 18 ते 35 वर्षे या वयोगटातील आहेत. या महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलतांना टपाल विभागाचे सचिव, विनीत पांडे यांनी सांगितले की, इंडिया पोस्टअंतर्गत, देशातीळ सर्वात मोठे वित्तीय समवेशनाचे जाळे उभरण्यास आम्ही कटिबद्ध असून, यात शहरी आणि ग्रामीण भारतातही आमच्या बँकिंग सेवा विस्तारल्या आहेत. केवळ तीन वर्षात, पाच कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची कामगिरी या बँक मॉडेलच्या यशाची पावतीच ठरली आहे. यातून किफायतशीर, सुलभ, सोपी आणि सुरक्षित डिजिटल व्यवस्था, विशेषतः देशाच्या ग्रामीण भागात, निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या घरांपर्यंत बँकिंग सेवा पुरवून आम्ही त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात हातभार लावू शकलो, याचा आम्हाला विशेष आनंद आहे.” PPF Calculator : सुरक्षित गुंतवणूक करुन बना करोडपती; दरमाह किती गुंतवणूक करावी लागेल? इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जे वेंकटरामु यांनी यावर प्रतिक्रिया देतांना सांगितले की, “ हा बँकेसाठी अभिमानाचा क्षण आहे.आम्ही आमचा ग्राहक विस्तार करतांना, सामर्थ्याकडून सामर्थ्याकडे वाटचाल केली आहे. कोविड-19 महामारीच्या काळातही, आम्ही ग्राहकांना निर्वेक्ष बँकिंग आणि सरकार-ते ग्राहक (G2C) सेवा पुरवल्या आहेत.विशेष म्हणजे, बँकेने आपले ग्राहक तयार करतांना संपूर्णपणे कागदरहित व्यवहार करत डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केला आहे. ग्रामीण, बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांची ,त्यांना आवश्यक असलेली उत्पादने आणि सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे.”
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Money, Post office

    पुढील बातम्या