जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Loan on Life Insurance: तुमचा विमा मिळवून देऊ शकतो स्वस्त लोन; या चार स्टेप्सद्वारे करा अर्ज

Loan on Life Insurance: तुमचा विमा मिळवून देऊ शकतो स्वस्त लोन; या चार स्टेप्सद्वारे करा अर्ज

Zero Cost Term Insurance: आता टर्म पॉलिसी बंद केल्यावर प्रीमियम मिळेल परत, वाचा आश्चर्यकारक फायदे

Zero Cost Term Insurance: आता टर्म पॉलिसी बंद केल्यावर प्रीमियम मिळेल परत, वाचा आश्चर्यकारक फायदे

Loan on Life Insurance: सध्या विमा कंपन्या कर्जावर 9 ते 10 टक्के दरानं कर्ज देत आहेत. बँका किंवा इतर कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये हा दर 12-18 टक्क्यांपर्यंत असू शकतो. या संदर्भात, विम्यावर घेतलेलं कर्ज किफायतशीर आणि स्वस्त असतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 ऑगस्ट: जेव्हा आपल्याला अचानक पैशाची गरज भासते तेव्हा आपण काय करतो? एकतर क्रेडिट कार्डवरून कर्ज घेतो किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करतो. परंतु आपण आपल्या विमा पॉलिसीकडे क्वचितच लक्ष देतो. सत्य हे आहे की एखादी व्यक्ती विमा पॉलिसीवर सहजपणे कर्ज (Loan on Life Insurance) घेऊ शकते, तेही स्वस्त आणि सोयीस्कर पद्धतीनं. जिथे बँका किंवा फायनान्स कंपन्यांकडून घेतलेलं कर्ज महाग असते, तिथे लाइफ इन्शुरन्सवर घेतलेलं कर्ज काहीसं स्वस्तात मिळतं. तुमचाही जीवन विमा असेल तर आणीबाणीच्या परिस्थितीत कर्जाचा फारसा विचार करण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्सच्या माध्यमातून तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता आणि कर्ज मिळवू शकतात. लाइफ इन्शुरन्सवर कर्ज घेण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि या कर्जामुळे तुमच्या विमा संरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. विम्यावरून कर्ज घेण्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया. विम्यावरून कर्ज घेण्याची प्रक्रिया-

  • विमा कंपन्या कर्ज देण्यासाठी विशेष फॉर्म तयार करतात, जो तुम्हाला भरावा लागतो. यासाठी विमा कंपनीच्या जवळच्या शाखेत जावं लागेल.
  • तुम्ही विमा पॉलिसीच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करू शकता. त्याची प्रिंट काढा आणि ती भरा. फॉर्ममध्ये पॉलिसी तपशील आणि कर्जाची रक्कम प्रविष्ट करावी लागेल.
  • हा फॉर्म भरा आणि विमा पॉलिसीच्या जवळच्या शाखेत सबमिट करा. या कामात तुम्ही विमा एजंटचीही सेवा घेऊ शकता.
  • अनेक कंपन्या विम्याचे कर्ज देण्यासाठी ऑनलाइन सुविधाही देतात. तुम्ही कंपनीच्या पोर्टलवर जाऊन कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

तुम्हाला किती कर्ज मिळेल? विमा कंपन्या सरेंडर व्हॅल्यूच्या आधारे कर्जाची रक्कम ठरवतात. सहसा, जीवन विम्याच्या समर्पण मूल्याच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते. पेड-अप पॉलिसीमध्ये कर्जाची मर्यादा 85 टक्क्यांपर्यंत असू शकते. जर एखाद्या कंपनीनं ULIP वर कर्ज दिलं तर कर्जाची रक्कम तिच्या निधी मूल्यावर अवलंबून असते. सर्व विमा कंपन्या कर्जाची सुविधा देतात. केवळ मुदतीच्या विम्यावर कर्ज सुविधा उपलब्ध नाही. हेही वाचा-  SBIनं ग्राहकांसाठी सुरू केली खास सुविधा, आता Whatsappवर उपलब्ध होणार ‘या’ सेवा व्याज दर काय असेल? सध्या विमा कंपन्या कर्जावर 9 ते 10 टक्के दरानं कर्ज देत आहेत. बँका किंवा इतर वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये हा दर 12-18 टक्क्यांपर्यंत असू शकतो. या संदर्भात, विम्यावर घेतलेले कर्ज किफायतशीर आणि स्वस्त असतं. बहुतेक विमा कंपन्या त्यांचे दर सहामाही चक्रवाढ व्याजाच्या आधारावर मोजतात. बहुतेक विमा कंपन्या 10 टक्के दरानं कर्ज देतात आणि कर्ज दोन हप्त्यांमध्ये भरावं लागतं. किती दिवसात कर्ज मिळेल? कर्जाचा कालावधी किती असेल, ते विम्याच्या मुदतीवर अवलंबून असतं. जर तुमच्याकडे 5 वर्षांचा विमा असेल तर तुम्ही 5 वर्षांसाठी कर्ज घेऊ शकता. कोणत्याही परिस्थितीत मुदतपूर्तीपूर्वी कर्जाची परतफेड करणं आवश्यक आहे. कर्जाची परतफेड न केल्यास, व्याजाची रक्कम मूळ रकमेत जोडली जाईल. कर्ज आणि व्याजाची रक्कम सरेंडर मूल्यापेक्षा जास्त असल्यास, पॉलिसी समाप्त केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: insurance , loan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात