नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: टेक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली जात आहे. गुगल अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. या कंपन्यांच्या यादीत आता लिंक्डइनचं नावही अॅड झालंय. विशेष बाब म्हणजे युजर्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर नोकऱ्या शोधण्यासाठी करतात आणि आता या कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने रिक्रूटमेंट विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नारळ दिलंय. लिंक्डइनने केलेल्या नोकर कपातीमुळे किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या हे सध्या स्पष्ट झालेले नाही. LinkedIn चा मालकी हक्क हा अमेरिकन टेक कंपनी मायक्रोसॉफ्टकडे आहे. हे एक विशेष सोशल नेटवर्क आहे. ज्यावर यूझर्स नोकऱ्या शोधतात. द इन्फॉर्मेशन या न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या रिक्रूटिंग विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलेय. गेल्या काही महिन्यांपासून टेक सेक्टरमध्ये सातत्याने नोकरकपात केली जातेय. टेक कंपन्या खर्च कमी करण्यासाठी टाळेबंदीचा पर्याय निवडत आहेत. आता लिंक्डइनही या यादीत समाविष्ठ झालेय.
फसवणुकीपासून सावधान! अशा ओळखा 500 च्या बनावट नोटानुकतीच मायक्रोसॉफ्टमध्ये झाली होती टाळेबंदी
जानेवारीमध्ये मायक्रोसॉफ्टने 10,000 लोकांना कामावरून काढून टाकण्यास सांगितले होते. या छाटणीमुळे जगभरात काम करणाऱ्या कंपनीच्या 5 टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. टेक फर्मच्या म्हणण्यानुसार, घटत्या कमाईमुळे पुढील खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेय. कंपनीने पुढे सांगितले की, ती धोरणात्मक क्षेत्रात गुंतवणूक करणे सुरू ठेवेल, ज्यामध्ये कॅपिटल आणि टॅलेंट या दोन्हींचा समावेश आहे.
म्यूचुअल फंडवर कर्ज घ्यायचंय? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व डिटेल्ससुरुवातीला ट्विटरने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिले होते. यासह अमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा अनेक मोठ्या कर्मचाऱ्यांना आपल्या अनुभवी कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. आयबीएम या मोठ्या कंपनीने देखील आपल्या काही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे आता टेक सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी हे चिंतेत आहेत.