मुंबई, 14 सप्टेंबर : कोरोना संसर्गाने अनेकांनी आपल्या जवळण्याचा व्यक्ती जाण्याचं दुःख पचवलं आहे. यात काही तरुणांचाही समावेश होता. विशेषकरुन घरातील कमावती व्यक्ती गेल्याने बायकापोरं रस्त्यावर आल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या प्रियजनांवर अशी परिस्थिती ओढावू नये यासाठी अनेकजण आधीच तरतूद करुन ठेवतात. तुमच्याही मनात असाच काही विचार सुरू असेल तर एलआयसीने एक विशेष योजना आणली आहे. एलआयसी अर्थात लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही भारतातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. देशातील प्रत्येक वर्गाच्या आणि लोकांच्या गरजेनुसार नवीन विमा पॉलिसी आणत राहते. कोरोनाच्या काळात, विमा पॉलिसी बद्दल लोकांमध्ये जागरुकता खूप वेगाने वाढली आहे. आजकाल लोक पॉलिसी विकत घेत आहेत. टर्म पॉलिसीची क्रेझ बाजारात खूप वेगाने वाढली आहे. आता टर्म प्लॅनचे नाव ऐकल्यावर मनात पहिला प्रश्न येतो की टर्म प्लॅन आणि सामान्य जीवन विमा पॉलिसीमध्ये काय फरक आहे? एलआयसी टेक टर्म पॉलिसी काय आहे? सामान्य पॉलिसीमध्ये, तुम्ही प्रीमियम जमा करत राहता आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकरकमी पैसे मिळतात किंवा मधे-मधे मनी बॅक रूपात पैसे मिळतात. दुसरीकडे, मुदतीच्या योजनांमध्ये, तुम्हाला मॅच्युरिटीवर कोणत्याही प्रकारचे पैसे मिळत नाहीत. यामध्ये तुमची पॉलिसी ठराविक कालावधीनंतर संपते. यात पॉलिसी टाइम पीरियडमधे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. एलआयसीने आपल्या गुंतवणूकदारांच्या गरजा लक्षात घेऊन टर्म पॉलिसी सुरू केली आहे. या पॉलिसीचे नाव आहे एलआयसी टर्म पॉलिसी क्रमांक 854. या पॉलिसीद्वारे तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करू शकता. या पॉलिसीद्वारे, तुम्हाला किमान 50 लाख रुपयांच्या विमा रकमेचा लाभ मिळतो. वाचा - प्रेशर कुकर बनवणारी ही कंपनी FD वर देतेय चक्क 8 टक्के व्याज दर! गुंतवणुकीसाठी तीन पर्याय एलआयसी टर्म प्लॅन तपशील ही पॉलिसी एक टर्म प्लॅन योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करू शकता. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. या पॉलिसीची किमान विमा रक्कम 50 लाख रुपये आहे. जर महिलांनी ही पॉलिसी खरेदी केली तर त्यांना विशेष सवलत मिळते. ही पॉलिसी 10 ते 40 वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी केली जाऊ शकते. फक्त स्वतःचे उत्पन्न असलेले लोक पॉलिसीमधून गुंतवणूक करू शकतात. या पॉलिसीच्या परिपक्वतेचे कमाल वय 80 वर्षांपर्यंत असावे. प्रीमियम भरण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध एलआयसीच्या टर्म पॉलिसीमध्ये तुम्ही तीन प्रकारे प्रीमियम भरू शकता. पहिला पर्याय नियमित प्रीमियम, दुसरा मर्यादित आणि तिसरा सिंगल प्रीमियम आहे. नियमित प्रीमियममध्ये, तुम्हाला दरवर्षी प्रीमियम भरावा लागतो. तर मर्यादित प्रीमियममध्ये, तुम्हाला दर 5 किंवा 10 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. तर सिंगल प्रीमियममध्ये, तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल. किती प्रीमियम भरावा लागेल जर तुम्ही वयाच्या 21 व्या वर्षी 20 वर्षांच्या कालावधीसाठी पॉलिसी खरेदी केली तर तुमचा प्रीमियम 6,438 रुपये असेल. त्याच वेळी, 40 वर्षांच्या वयासाठी 8,826 रुपये प्रीमियम आणि तुम्ही ही पॉलिसी 40 वर्षांच्या वयात 20 वर्षांसाठी खरेदी केल्यास, तुम्हाला वार्षिक प्रीमियम म्हणून एकूण 16,249 रुपये भरावे लागतील. एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही पॉलिसी खरेदी करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.