जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LICची जबरदस्त स्कीम! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

LICची जबरदस्त स्कीम! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

LICची जबरदस्त स्कीम! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

LICची जबरदस्त स्कीम! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

LIC Saral Pension: ही योजना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे (www.licindia.in) ऑफलाइन किंवा ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते. ही पॉलिसी सुरू झाल्यापासून 6 महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते, त्याचप्रमाणे पॉलिसीधारक पॉलिसी सुरू झाल्यापासून सहा महिन्यांनंतर कर्जासाठी अर्ज करू शकतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 सप्टेंबर: पगारदार व्यक्ती असो वा व्यवसाय करणारी व्यक्ती, प्रत्येकाला अशी गुंतवणूक करायची असते जी त्यांच्या वृद्धापकाळात उपयोगी ठरेल किंवा निवृत्तीनंतर पैशाच्या कमतरतेवर मात करता येईल. तुम्हीही या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने अशी गुंतवणूक योजना आणली आहे, ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून आजीवन पेन्शन मिळवू शकता. वयाच्या 40व्या वर्षापासून मिळेल पेन्शन- बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LICने तुमच्या आजीवन पेन्शनची सोय केली आहे. LIC द्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या या योजनेचं नाव ‘सरल पेन्शन योजना’ आहे. LIC सरल पेन्शन योजनेत तुम्हाला 60 वर्षांनंतर नाही तर वयाच्या 40 व्या वर्षीपासून पेन्शन मिळू लागेल. या योजनेअंतर्गत, खरेदीदाराला योजनेचा प्रीमियम एकरकमी भरावा लागतो आणि पॉलिसी घेतल्यानंतरच त्याला पेन्शन मिळू लागते. तुम्ही प्लॅनमध्ये दोन पर्याय घेऊ शकाल: एलआयसी सरल पेन्शन योजना दोन पर्यायांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. यापैकी एक सिंगल लाइफ प्लॅन आणि दुसरा जॉइंट लाइफ प्लॅन आहे. सिंगल लाईफ ऑप्शन अंतर्गत, ही पॉलिसी कोणत्याही एका व्यक्तीच्या नावाने घेतली जाऊ शकते. या पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. दरम्यान जर तो मरण पावला, तर कागदपत्रांमध्ये नोंदवल्याप्रमाणे संपूर्ण मूळ प्रीमियम रक्कम नॉमिनीला दिली जाते. याशिवाय जर तुम्ही जॉईंट लाईफचा पर्याय निवडला तर पती-पत्नी दोघे मिळून पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. याचा अर्थ असा की योजना घेतल्यानंतर, जोपर्यंत प्राथमिक पॉलिसीधारक जिवंत आहे, तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहते. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला तर पत्नीला समान पेन्शन मिळू लागते. दोघांचा मृत्यू झाल्यास मूळ प्रीमियमची रक्कम नॉमिनीला दिली जाते. हेही वाचा:  Business loan: तुम्हालाही व्यवसाय कर्जासाठी अर्ज करायचाय? ‘ही’ कागदपत्रं आहेत आवश्यक एलआयसीने ‘ही’ वयोमर्यादा निश्चित केली आहे: या पॉलिसी अंतर्गत प्रीमियम भरल्यानंतर ज्या रकमेतून पेन्शन सुरू होते, तीच पेन्शन आयुष्यभर सुरू राहते. या योजनेत चार प्रकारे पेन्शन मिळू शकते. म्हणजेच तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. LIC सरल पेन्शन योजनेसाठी किमान वय 40 वर्षे निश्चित केलं आहे, तर कमाल वय 80 वर्षे निश्चित केले आहे. अशा प्रकारे करा गुंतवणूक करण्याचा विचार: एलआयसीची ही पॉलिसी सुरू झाल्यापासून 6 महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते, तसेच तिच्यात कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. पॉलिसी सुरू झाल्यापासून सहा महिन्यांनंतर ग्राहक कर्जासाठी अर्ज करू शकतात. गुंतवणुकीचे आणि पेन्शनचे गणित समजून घेतले तर 60 वर्षे वयाच्या व्यक्तीने 10 लाख रुपये गुंतवले आणि वार्षिक पेन्शनचा पर्याय निवडला. तर त्यामुळे त्याला 58,950 रुपये मिळतील. हा प्लॅन एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट (www.licindia.in) द्वारे ऑफलाइन किंवा ऑनलाइन खरेदी केला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC
  • First Published :
जाहिरात
जाहिरात