मराठी बातम्या /बातम्या /मनी /

फायद्याची बातमी! 160 रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळवा 23 लाख, वाचा LIC ची नवी पॉलिसी

फायद्याची बातमी! 160 रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळवा 23 लाख, वाचा LIC ची नवी पॉलिसी

जर तुम्हाला थोडी गुंतवणूक करायची असेल आणि भरपूर परतावा घ्यायचा असेल तर अशीच एक LICची नवी योजना आहे.

जर तुम्हाला थोडी गुंतवणूक करायची असेल आणि भरपूर परतावा घ्यायचा असेल तर अशीच एक LICची नवी योजना आहे.

जर तुम्हाला थोडी गुंतवणूक करायची असेल आणि भरपूर परतावा घ्यायचा असेल तर अशीच एक LICची नवी योजना आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : भारतीय जीवन विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India- LIC) ही एक सरकारी विमा कंपनी आहे. ही कंपनी विविध विमा आणि गुंतवणूकीचे पर्याय देते. LICच्या बऱ्याच पॉलिसी या लोकांसाठी फायद्याच्या असतात. जर तुम्हाला थोडी गुंतवणूक करायची असेल आणि भरपूर परतावा घ्यायचा असेल तर अशीच एक LICची नवी योजना आहे. एलआयसीनं सुरू केलेल्या या योजनेचे नाव आहे एलआयसी न्यू मनी बॅक पॉलिसी (LIC New Money Back Policy) आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी 5 वर्षात विमाधारकाला पैसे परत मिळतात, मॅच्युरिटीमध्ये चांगले रिटर्नही मिळतात. त्याशिवाय करामध्येही लाभ होतो. एलआयसीची ही मनी बॅक प्लॅन नॉन-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. जी तुम्हाला हमखास रिटर्न आणि बोनस देते. आपल्याला ही योजना घेण्यासाठी 20 वर्ष आणि 25 वर्षांचे 2 पर्याय मिळतील.

वाचा-दिवाळीत सोनं-चांदी खरेदी करताय? मग असं ओळखा तुमचं सोनं शुद्ध आहे का

कर सवलतीसह अनेक फायदे

ही पॉलिसी पूर्णत: कर मुक्त आहे. यासह, त्याच्या व्याज, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्युरिटीवर प्राप्त झालेल्या रकमेवरही कोणताही कर आकारला जाणार नाही. या योजनेत जर तुम्ही 25 वर्षांसाठी दररोज 160 रुपये गुंतवत असाल तर 25 वर्षांनंतर तुम्हाला 23 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतील.

वाचा-मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट! 26 क्षेत्रांना मिळणार फायदा

दर पाचव्या वर्षी 20% रक्कम परत

LIC च्या माहितीनुसार, एखादी व्यक्ती 13 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंत ही योजना घेऊ शकते. या योजनेत दर पाचव्या वर्षी म्हणजेच 5 व्या वर्षी, 10 व्या वर्षी, 15 व्या वर्षी, 20 व्या वर्षी तुम्हाला 15-20% पैसे परत मिळतील. परंतु प्रीमियमच्या किमान 10% रक्कम जमा केल्यावरच होईल. याबरोबरच गुंतवणूकदारांना मॅच्युरिटी बोनस देण्यात येईल. या योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 10 लाख रुपये मिळण्याची योजनाही आहे. तसेच, मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना बोनसही दिला जाईल.

First published: