नवी दिल्ली : एलआयसीने जीवन आझाद ही एक नवी जीवन विमा पॉलिसी बाजारात आणली आहे. या पॉलिसीला ग्राहकांनी इतका चांगला प्रतिसाद दिलाय, की केवळ 15 दिवसांत 50 हजार ग्राहकांनी ही पॉलिसी घेतली आहे. या पॉलिसीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जितका प्रिमिअम भराल, तितके जास्त दिवस तुम्हाला विम्याचं संरक्षण मिळतं. तसंच नंतर व्याजासह पैसे परतही मिळतात.
एलआयसीच्या या नव्या पॉलिसीला ग्राहकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. केवळ 15 दिवसांत 50 हजार ग्राहकांनी ही पॉलिसी घेतली आहे. या पॉलिसीमध्ये विम्याच्या रकमेवर व्याज तर मिळतंच, शिवाय जीवन विम्याचं संरक्षणही मिळतं.
ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडन्यूज! या 10 बँकांमध्ये FD वर मिळतोय जबरदस्त परतावा
या पॉलिसीमध्ये ग्राहकांना विम्याच्या मुदतीपेक्षा 8 वर्षं कमी हप्ता भरावा लागेल. म्हणजेच ग्राहकांनी 18 वर्षांचा विमा काढला असेल, तर त्यांना केवळ 10 वर्षांचाच हप्ता भरावा लागेल. विम्याची मुदत संपल्यावर एलआयसीकडून एक ठरावीक रक्कम परत केली जाईल. त्याला बेसिक सम अॅश्युअर्ड असं म्हणतात. ठरावीक रक्कम म्हणजे एलआयसी ग्राहकांना 2 लाख किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपये देईल. ग्राहक 15 किंवा 20 वर्षांसाठी ही विमा पॉलिसी घेऊ शकतात.
या विमा पॉलिसीमध्ये ग्राहक 28व्या वर्षापासून 12,083 रुपये दर वर्षाला गुंतवत असेल व हा प्लॅन 18 वर्षांसाठीचा असेल, तर विम्याची मुदत संपल्यावर ग्राहकाला 2 लाखांची अशुअर्ड सम मिळेल. त्यावर 4-5 टक्के व्याजही मिळेल. या पॉलिसीवर डेथ बेनिफिटच्या स्वरूपात बेसिक सम अॅश्युअर्ड किंवा वार्षिक प्रीमिअमच्या 7 टक्के इतकी रक्कम मिळते. मृत्यू झालेल्या तारखेवेळी भरलेल्या प्रिमिअमपेक्षा विम्याची रक्कम 105 टक्क्यांपेक्षा कमी असणार नाही, याची दक्षता घेतली जाते.
दुकानदार कॅरीबॅगचे वेगळे पैसे मागू शकतो का? काय सांगतो कायदा?
एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ही विमा पॉलिसी बाजारात आल्यावर केवळ 15 दिवसांतच 50 हजार ग्राहकांनी ती घेतली आहे. ही पॉलिसी जानेवारी 2023मध्ये बाजारात लाँच झाली आहे. ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी कंपनी पोर्टफोलिओ मिक्स करण्यावर लक्ष देत असल्याचं कुमार यांचं म्हणणं आहे. एलआयसीला डिसेंबर तिमाहीमध्ये 6334 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या त्याच तिमाहीत तो नफा 235 कोटी रुपये होता. एलआयसीच्या नॉन पार्टिसिपेटिंग फंडमधून 5670 कोटी रुपये शेअरधारकांना मिळाल्यानं कंपनीच्या नफ्यामध्ये इतकी मोठी वाढ झाली आहे. कंपनीचं निव्वळ उत्पन्न 97620 कोटी रुपयांवरून 1.1 लाख कोटी रुपयांपर्यंत गेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC