नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : जर तुम्हीही एलआयसीची (LIC) एखादी पॉलिसी घेण्याबाबत विचार करत असाल, तर एक असा प्लान आहे ज्यात प्रत्येक दिवशी केवळ 63 रुपये द्यावे लागतील. एलआयसी जीवन आनंद पॉलिसी (LIC Jeevan Anand Policy ) असं या खास प्लानचं नाव आहे.
काय आहेत या पॉलिसीची वैशिष्ट्य -
- LIC जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचं वयं 26 वर्ष असावं.
- हा प्लान 25 वर्षाच्या अवधिवर रिटर्न ऑफर करतो.
- बोनस सुविधा, लिक्विडिटी आणि गुंतवणूकीच्या हिशोबाने ही एलआयसीच्या पॉलिसीजपैकी सर्वोत्तम पॉलिसी मानली जाते.
- या पॉलिसीअंतर्गत किमान विमा रक्कम एक लाख रुपये आहे, अधिकसाठी कोणतीही मर्यादा नाही.
- ही एक एंडोमेन्ट पॉलिसी आहे. म्हणजे यात गुंतवणूकदाराला गुंतवणूक आणि विमा दोघांचा फायदा मिळतो.
पॉलिसी अवधी -
न्यू जीवन आनंद प्लानसाठी पॉलिसीचा अवधी 15 ते 35 वर्ष आहे. LIC ची न्यू जीवन आनंद पॉलिसी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे खरेदी करू शकता.
प्रीमियम -
या पॉलिसीसाठी वार्षिक, 6 महिने आणि दर महिन्याला प्रीमियम भरता येतो. पॉलिसी खरेदी केल्याच्या 3 वर्षांनंतर आपल्याच पॉलिसीतून कर्जही घेता येऊ शकतं.
(वाचा -
जगातील सर्वात महागडा कबूतर; एवढ्याशा कबूतरची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल)
वय - 26
टर्म - 20
डीएबी - 400000
डेथ सम एश्योर्ड - 500000
बेसिक सम एश्योर्ड - 400000
फर्स्ट ईयर प्रीमियम 4.5% टॅक्ससह -
वार्षिक - 23857 (22830 + 1027)
अर्धवार्षिक - 12052 (11533 + 519)
त्रैमासिक - 6087 (5825 + 262)
मासिक - 2029 (1942 + 87)
वायएलवी मोड अॅवरेज प्रीमियम/प्रतिदिन - 65
(वाचा -
Samsung च्या या स्मार्टफोनवर ऑफर;17 हजारांचा स्मार्टफोन 10,860 रुपयांत खरेदी करा)
कसे मिळतील 7 लाख -
एखाद्या व्यक्तीने 26व्या वर्षात 20 वर्षाच्या टर्म प्लानमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, त्यासोबत 400000 रुपयांचा सम एश्योर्ड निवडल्यास, त्याला पहिल्या वर्षात 23344 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल.
त्यानंतर दुसऱ्या वर्षी टॅक्स दर 2.25% झाल्यास, प्रीमियममध्ये घट होईल. त्यानुसार प्रति वर्ष 23344 रुपये म्हणजेच दररोज 63 रुपये गुंतवावे लागतील. हा प्रीमियम 20 वर्षांपर्यंत भरावा लागेल. त्यानंतर मॅच्युरिटीवर 764000 रुपये मिळतील.
टॅक्स बेनिफिट -
आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, प्रीमियम भरण्यावेळी टॅक्स बेनिफिटही मिळतो. मॅच्युरिटी किंवा मृत्यूनंतर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.