मुंबई, 10 सप्टेंबर : एलआयसी ही सरकारी विमा कंपनी (Life Insurance Corporation) आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी नव्या पॉलिसीज घेऊन येते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही देशातली सर्वांत मोठी आणि जुनी विमा कंपनी असून, देशभरात त्यांचे कोट्यवधी पॉलिसी होल्डर्स आहेत. एलआयसी देशाच्या प्रत्येक आर्थिक स्तरातल्या नागरिकांसीठी वेळोवेळी नवनव्या विमा पॉलिसीज लॉन्च करत असते. त्यामुळे नागरिक आपापल्या भविष्यातल्या गरजा आणि भविष्यातल्या क्षमतेनुसार गुंतवणूक करू शकतात. एलआयसीच्या अशा एका पॉलिसीची माहिती घेऊ या, ज्यामध्ये गुंतवणूक करून सुरक्षा आणि बचत दोन्हींचा लाभ मिळतो. या पॉलिसीचं नाव एलआयसी विमा श्री पॉलिसी (LIC Bima Shree Policy) असं आहे. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'एबीपी लाइव्ह'ने दिलं आहे.
एलआयसी विमा श्री पॉलिसी म्हणजे एक नॉन लिंक्ड (Non Linked), पार्टिसिपेटिंग (Participating), इंडिव्हिज्युअल आणि लाइफ सेव्हिंग इन्शुरन्स प्लॅन (Life Saving Insurance Plan) आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यावर डेथ बेनिफिट म्हणून 125% पर्यंत सम अॅश्युअर्डचा लाभ मिळतो. ही पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल, तर त्याची तपशीलवार माहिती जाणून घ्या.
- एलआयसी विमा श्री पॉलिसीची वैशिष्ट्यं
पॉलिसीवर मिळणारी मिनिमम सम अॅश्युअर्ड - 10 लाख रुपये
पॉलिसीवर मिळणारी मॅक्झिमम सम अॅश्युअर्ड - कोणतीही मर्यादा नाही.
पॉलिसी टर्म - 14, 16, 18 आणि 20 वर्षं
प्रीमियम भरण्याचा कालावधी - 4 वर्षं
पॉलिसी खरेदी करण्यासाठी किमान वय - 8 वर्षं
पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमाल वय - 55 वर्ष (14 वर्ष पॉलिसी टर्म), 51 वर्ष (16 वर्ष पॉलिसी टर्म), 48 वर्ष (18 वर्षं पॉलिसी टर्म), 45 वर्ष (20 वर्ष पॉलिसी टर्म)
वाचा - गुंतवणूक करताना रिस्क नको? तर पोस्ट ऑफिसमध्ये FD वर मिळतंय आकर्षक व्याजदर अन् सुविधा
रिटर्न
एलआयसी विमा श्री पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीपूर्वी गुंतवणूकदाराला मधूनमधून बेसिक सम अॅश्युअर्डचा रिटर्न मिळेल. गुंतवणूकदार एकदम मॅच्युरिटीनंतर रिटर्न मिळण्याचा ऑप्शनही स्वीकारू शकतो. या पॉलिसीचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामासिक किंवा वार्षिक अशा प्रकारे भरता येतो.
डेथ बेनिफिट
पॉलिसी होल्डरला यात गुंतवणूक करून दोन प्रकारे फायदा होऊ शकतो. पहिला म्हणजे मॅच्युरिटीनंतर मिळणारे पैसे आणि दुसरं म्हणजे डेथ बेनिफिट. पॉलिसी विकत घेतल्यानंतर 5 वर्षांच्या आत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला विमा रकमेचा लाभ मिळेल. दुसरीकडे, पॉलिसी खरेदी केल्यानंतर 5 वर्षांनंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास मूळ विमा रकमेच्या 125% किंवा वार्षिक प्रीमियमच्या 7 पट एवढा क्लेम मिळेल.
टॅक्स आणि लोनचे नियम
या पॉलिसीचे प्रीमियम सलग दोन वर्षं भरल्यास या पॉलिसीवर लोनची सुविधा मिळू शकते. याबरोबरच, प्रीमियम ग्राहकाने निवडलेल्या कालावधीवर आणि सम अॅश्युअर्डच्या रकमेवर अवलंबून असेल.
मॅच्युरिटीच्या सम अॅश्युअर्डचे तपशील
14 वर्षांच्या पॉलिसी टर्मवर बेसिक सम अॅश्युअर्डच्या 40%
16 वर्षांच्या पॉलिसी टर्मवर बेसिक सम अॅश्युअर्डच्या 30%
18 वर्षांच्या पॉलिसी टर्मवर बेसिक सम अॅश्युअर्डच्या 20%
20 वर्षांच्या पॉलिसी टर्मवर बेसिक सम अॅश्युअर्डच्या 10%
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC, Policy plans