जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुम्ही व्याजाने पैसे वाटता का? अवश्य जाणून घ्या सावकार कायद्याचे नियम आणि कायदे

तुम्ही व्याजाने पैसे वाटता का? अवश्य जाणून घ्या सावकार कायद्याचे नियम आणि कायदे

सावकारी व्यवसाय

सावकारी व्यवसाय

देशात खाजगीरित्या व्याजाने पैसे वाटण्यासाठी लायसन्स असणं गरजेचं असतं. एखादा व्यक्ती ठरलेल्या दरापेक्षा जास्त व्याज वसूल करत असेल तर त्याच्यावर कारवाई देखील करता येते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 जून : अनेकदा महत्त्वाच्या कामांसाठी आपल्याकडे असलेले पैसे पुरेसे नसतात. अशा वेळी लोन घेण्याची गरज भासते. व्यक्तीच्या खाजगी आणि व्यापारी गरजांसाठी सामान्यतः लोन देण्याचं काम बँक किंवा वित्तीय संस्था करत असतात. RBI ने यांना लायसन्स दिलंय. लोन देणारी प्रत्येक संस्था कर्जदाराकडून व्याज वसूल करते. हे व्याज रिझर्व्ह बँक वेळोवेळी ठरवत असते. मात्र बँकांव्यतिरिक्त देशात अनेक लोक व्याजावर पैसे वाटण्याचं काम करतात.

News18लोकमत
News18लोकमत

देशात अनेक गरीब आणि गरजू लोक आहेत. जे बँकेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा बँकेने त्यांना कोणत्याही कारणास्तव कर्ज देण्यास नकार दिला तर ते गावात किंवा शहरात असलेल्या सावकारांकडून व्याजावर पैसे घेतात. व्याजाशी संबंधीत कोणतेही काम करण्यासाठी लायसन्स घेणे गरजेचं असतं. मात्र तरीही देशात असे अनेक लोक आहेत जे लायसन्स नसतानाही हे काम करतात. चला तर मग जाणून घेऊया याचे दुष्परिणाम काय…

सावकार कायद्याचं पालन करणं गरजेचं

लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, व्याजाचा व्यवसाय करण्यासाठी मनी लेंडिंग अॅक्ट अंतर्गत सरकारी संस्थेकडून लायसन्स घ्यावं लागतं. यासाठी अनेक राज्यांमध्ये सावकारी कायदेही आहेत. या अंतर्गत अधिकृत संस्था व्याजावर पैसे देण्याचे काम करणाऱ्या लोकांना लायसन्स देते. व्याजावर पैसे वाटण्याचे काम करत असाल किंवा करू इच्छित असाल तर तुमच्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय व्याजावर पैसे वाटण्याचा धंदा बेकायदेशीर मानला जातो.

Fixed Deposit: एफडीचा पैसा किती वर्षात होईल डबल? असं करा कॅलक्युलेशन

लायसन्स कसं मिळतं

व्याजावर पैसे देण्याचे काम सुरू करण्यासाठी आपल्या राज्यातील संबंधित संस्थेशी संपर्क साधून अर्ज करावा लागतो. यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्यवस्था असतात. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 नुसार परवानाधारक सावकाराना काही अटी आणि नियम निश्चित करण्यात आले आहेत. यासोबतच परवाना मिळण्याची पद्धतही निश्चित केली आहे. यानुसार सावकारी व्यवसाय करण्यासाठी रीतसर अर्ज सहाय्यक निबंधकांकडे करणे बंधनकारक करण्यात आलेय. सावकारी परवान्याचा कालावधी आता 1 एप्रिल ते 31 मार्च असा राहील. या कायद्यानुसार निबंधकांना दिवाणी न्यायलयास असलेले न्यायिक अधिकार प्रदान करण्यात आलेय.

Health Insurance : हेल्थ इन्शुरन्सविषयी कन्फ्यूस्ड आहात? सोप्या शब्दात समजून घ्या ही माहिती

 लायसन्स असुनही देखील अनेक सावकार भरमसाट व्याज आकारतात. यामुळे कर्जदारांच्या पदरी निराशा येते. दरम्यान कर्ज आणि व्याजाच्या ओझ्याला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्याची अशी अनेक प्रकरणे देशात समोर आली आहेत. एखाद्याला पैसे देऊन जास्त व्याज आकारणे हा स्पष्टपणे गुन्हा मानला जातो. या व्यवसायात मनमानी पद्धतीने कोणताही व्याजदर लावता येत नाही. फक्त सरकारने निश्चित केलेले व्याजदरच आकरता येतात. मात्र अनेक लोक बेकायदेशीरपणे जास्त व्याज आकारतात. मात्र असं करणं बेकायदेशीर असतं.

सावकारांच्या जाचापासून बचावासाठी अ‍ॅग्रीमेंट तयार करा

व्याज माफियांकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणं टाळाच. पण तुम्ही पैसे घेत असाल तर कोऱ्या स्टाम्पवर किंवा कोऱ्या चेकवर सही करून देऊ नका. कर्जदाराने एक अ‍ॅग्रीमेंट केलं पाहिजे. ज्यामध्ये रक्कम आणि व्याजदर स्पष्टपणे नमूद करायला हवा. यामध्ये हे देखील लिहिलं पाहिजे की, चेक एक सिक्योरिटीसाठी देत आहोत. अॅग्रीमेंट करुनही एखाद्या व्यक्तीने मनमानी पद्धतीने वसुली केली तर त्याच्याविरोदात एफआयआर दाखल केला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: loan , Money18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात