Home /News /money /

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींना ब्रेक, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींना ब्रेक, जाणून घ्या आजचे दर

आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Prices) स्थिर आहेत. यामुळे देशातील सामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

    नवी दिल्ली 12 मार्च : सरकारी इंधन कंपन्यांकडून सलग तेराव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बदल केला गेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Prices) स्थिर आहेत. यामुळे देशातील सामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. देशाच्या राजधानीसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये दर स्थिर आहेत. शुक्रवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ९१.१७ तर डिझलची किंमत (Diesel Prices) ८१.४७ रुपये प्रतिलिटर इतकी होती. २७ फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल झालेला नाही. रोज सकाळी ६ वाजता बदलतात दर - रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये (Petrol Diesel Price) बदल होत असतात. सकाळी ६ वाजतापासूनच नवीन दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडून किंमत जवळपास दुप्पट होते. विदेशी चलनासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतात. पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर - दिल्लीमध्ये पेट्रोल 91.17 आणि डिझेल 81.47 प्रति लीटर मुंबईमध्ये पेट्रोल 97.57 आणि डिझेल 88.60 प्रति लीटर कोलकातामध्ये पेट्रोल 91.35 आणि डिझेल 84.35 प्रति लीटर चेन्नईमध्ये पेट्रोल 93.11 आणि डिझेल 86.45 प्रति लीटर नोएडामध्ये पेट्रोल 89.38 आणि डिझेल 81.91 प्रति लीटर बंगळुरुमध्ये पेट्रोल 94.22 आणि डिझेल 86.37 प्रति लीटर भोपाळमध्ये पेट्रोल 99.21 आणि डिझेल 89.76 प्रति लीटर चंडीगडमध्ये पेट्रोल 87.73 आणि डिझेल 81.17 प्रति लीटर असे तपासा पेट्रोल डिझेलचे दर - तुम्ही SMS च्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तपासू शकता. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी ६ वाजता अपडेट होतात. इंडियन ऑईल वेबसाईटनुसार, तुम्हाला RSP सह आपल्या शहराचा कोड टाईप करून 9224992249 या नंबरवर SMS पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. हा आपण IOCLच्या वेबसाईटवर पाहू शकता. तर BPCL ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि HPCL ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Inflation, Money, Petro price hike, Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या