मराठी बातम्या /बातम्या /मनी /

चांगल्या बँकेत FD करण्याचा विचार करताय? प्रमुख बँकांचे 'एफडी'साठीचे लेटेस्ट व्याजदर पहा

चांगल्या बँकेत FD करण्याचा विचार करताय? प्रमुख बँकांचे 'एफडी'साठीचे लेटेस्ट व्याजदर पहा

अलीकडच्या काळात कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावल्यासह काही कारणांमुळे एफडीवरच्या व्याजदरांवर परिणाम झाला होता. पण, आता परिस्थिती सावरू लागली आहे.

अलीकडच्या काळात कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावल्यासह काही कारणांमुळे एफडीवरच्या व्याजदरांवर परिणाम झाला होता. पण, आता परिस्थिती सावरू लागली आहे.

अलीकडच्या काळात कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावल्यासह काही कारणांमुळे एफडीवरच्या व्याजदरांवर परिणाम झाला होता. पण, आता परिस्थिती सावरू लागली आहे.

मुंबई, 3 जून : सेवानिवृत्तीनंतरचं जीवन सुखमय असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक (Investment) आणि बचतीवर (Saving) भर देत असतो. गेल्या काही वर्षांत गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) अर्थात एफडी (FD) हा त्यापैकीच मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा एक पर्याय होय. अनेक सरकारी, खासगी, सहकारी बँका आणि वित्तीय संस्था ही सुविधा उपलब्ध करून देतात. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये व्याजदर (Interest Rate) हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. कारण सर्व आर्थिक गणित हे या व्याजदरावर अवलंबून असतं. अलीकडच्या काळात कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावल्यासह काही कारणांमुळे एफडीवरच्या व्याजदरांवर परिणाम झाला होता. परंतु, आता परिस्थिती सावरू लागल्यावर काही वित्तीय संस्था एफडीवर आकर्षक व्याजदर देत आहेत.

3 जून 2022 रोजी काही प्रमुख बँकांच्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार, एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक एक वर्षापर्यंतच्या कालावधीकरिता सर्वाधिक 6.5 टक्के दराने व्याज देत आहे. तसंच एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर तीन ते पाच वर्षं कालावधीकरिता फिनकेअर स्मॉल फायनान्स बॅंक सर्वाधिक 7 टक्के व्याज देत आहे. `बँक बाजार डॉट कॉम`ने या दरांविषयीची माहिती संकलित केली आहे.

गुंतवणुकीच्या विविध प्रकारांमध्ये एफडी हा सर्वांत सुरक्षित असा पर्याय मानला जातो. विशिष्ट कालावधीसाठी ठराविक रक्कम फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवून तुम्ही त्यावर चांगलं व्याज मिळवू शकता. काही बँकांनी एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या नॉर्मल फिक्स्ड डिपॉझिटसाठीचे व्याज दर त्यांच्या वेबसाइटवर दिले आहेत. त्यानुसार एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी एक वर्षापर्यंत 5.25 टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी 6.5 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी 6.75 टक्के आणि 3 ते 5 वर्षांसाठी 6.75 टक्के असा व्याज दर देत आहे. हे दर 23 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

कर्जाच्या EMI बोजा वाढणार, 'या' चार बँकानी होम लोनवरील व्याज दर वाढवले

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (Equitas Small Finance Bank) एक कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर एक वर्षापर्यंत 5 टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी 6.5 टक्के, 2 ते 3 वर्षासाठी 6.75 टक्के आणि 3 ते 5 वर्षांसाठी 6 टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर 21 मार्चपासून लागू झालेले आहेत. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare Small Finance Bank) एक कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर एक वर्षापर्यंत 5.4 टक्के, 1 ते 2 वर्षं आणि 2 ते 3 वर्षं कालावधीसाठी 6.5 टक्के व्याज देत आहे. ही बॅंक 3 ते 5 वर्षं कालावधीसाठी सर्वाधिक 7 टक्के व्याजदर देत आहे. हे दर 24 मे 2022पासून लागू झाले आहेत.

जन स्मॉल फायनान्स बँक (Jana Small Finance Bank) एक कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर एक वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी 5.5 टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी 6.5 टक्के व्याजदर देत आहे. तसंच 2 ते 3 आणि 3 ते 5 वर्षं कालावधीसाठी 6.75 टक्के दराने व्याज देत आहे. हे व्याज दर 12 एप्रिलपासून लागू झाले आहेत.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने (Suryoday Small Finance Bank) 10 मार्चपासून नवे व्याजदर लागू केले आहेत. त्यानुसार एक कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर एक वर्षापर्यंत 5.75 टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी 6.5 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी 7 टक्के आणि 3 ते 5 वर्षांसाठी 6.75 टक्के व्याजदर ग्राहकांना मिळणार आहे.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर एक वर्षापर्यंत सर्वाधिक 6.5 टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी सर्वाधिक 6.9 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी सर्वांत जास्त 7.1 टक्के आणि 3 ते 5 वर्षांसाठी 6.25 टक्के व्याज दर देत आहे. हे सर्व व्याजदर 19 मेपासून लागू झाले आहेत.

First published: