नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : या आठवड्याच्या सुरुवातीला देखील सोन्याचांदीची झळाळी कमी झाली आहे. सोमवारी सोन्याचे दर प्रति तोळा 194 तर चांदीचे दर प्रति किलो 933 रुपयांनी कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे भाव प्रति तोळा 50,449 रुपये झाले आहेत. तर चांदी देखील 60 हजारांच्या खाली येत दर 59,274 रुपये प्रति किलो झाले आहेत. त्याआधी दोन व्यवहारिक दिवसांत चांदी 60,207 रुपये किलो होती. शुक्रवारी सोन्याचे दर 324 रुपये प्रति तोळाने वाढले होते, त्याचप्रमाणे चांदीतही 2124 प्रति किलोची वाढ झाली होती.
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते रुपयाचे मुल्य घसरल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. सोमवारी रुपयाचे मुल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 18 पैशांनी घसरून 73.79 वर आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी क्रमश: 1857 डॉलर प्रति औंस आणि 22.70 डॉलर प्रति औंस होते.
(हे वाचा-RBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू)
वाढत्या दबावामुळे सोन्याचे दर देशांतर्गत बाजारात देखील उतरले आहेत. गुंतवणुकदारांना प्रतीक्षा आहे ती अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची. कमजोर इक्विटी निर्देशकांवर डॉलरमध्ये तेजी नसताना सोन्याचे दर कमी झाले आहेत.
सोन्याच्या वायदे किंमतीत घसरण
स्पॉट किंमतीत घसरण झाल्यामुळे व्यावसायिकांनी त्यांचा जमा सौदा कमी केला, परिणामी वायदे बाजारात सोन्याचे दर 0.28 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यानंतर सोन्याचे दर 49,520 रुपए प्रति तोळावर आले आहेत. एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्याच्या डिलीव्हरीचे सोने 98 रुपये अर्थात 0.28 टक्क्यांनी कमी होत 49,520 रुपए प्रति तोळा झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या डिलीव्हरीचे सोने देखील 131 रुपये अर्थात 0.26 टक्क्यांनी उतर 49,519 रुपए प्रति तोळावर स्थीर झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.35 टक्केने घसरून 1,859.30 डॉलर प्रति औंस वर स्थीर झाले होते.
(हे वाचा-SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा)
आज देखील सोन्याचे दर उतरण्याची शक्यता आहे. आज सोने सराफा बाजारात 50 हजारांच्या खाली जाईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.