मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PF Interest: पीएफचे व्याजाचे पैसे अजून आले नसतील तर इथे तक्रार करा

PF Interest: पीएफचे व्याजाचे पैसे अजून आले नसतील तर इथे तक्रार करा

 तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) पैसे आले आहेत की नाही यासाठी तुम्ही देखील पीएफ खाते तपासावे. जर तुमच्या PF खात्यात अजून पैसे आले नाहीत, तर तुम्ही तक्रार करू शकता जेणेकरून पैसे तुमच्या खात्यात त्वरित ट्रान्सफर होतील.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 1 नोव्हेंबर : केंद्र सरकारने (Central Government) साडेसहा कोटी नागरिकांना दिवाळी भेट दिली आहे. EPFO ने भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) ग्राहकांच्या खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) पैसे आले आहेत की नाही यासाठी तुम्ही देखील पीएफ खाते तपासावे. जर तुमच्या PF खात्यात अजून पैसे आले नाहीत, तर तुम्ही तक्रार करू शकता जेणेकरून पैसे तुमच्या खात्यात त्वरित ट्रान्सफर होतील.

किती व्याजाचे पैसे जमा झाले?

विशेष म्हणजे, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करण्याच्या प्रस्तावाला सरकारने आधीच ग्रीन सिग्नल दिला होता. कामगार मंत्रालयानेही या निर्णयाला संमती दिली होती. आता EPFO ​​ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करण्यात येत आहे.

एसएमएसद्वारे बॅलेन्स चेक करा

EPFO कडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून EPFO UAN LAN मेसेज 7738299899 वर पाठवा. LAN म्हणजे तुमची भाषा. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असेल तर तुम्हाला LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM लिहावे लागेल. हिंदीत माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल.

मिस्ड कॉलद्वारे डिटेल्स मिळवा

मिस्ड कॉलद्वारे देखील आपले ईपीएफ शिल्लक जाणून घेता येऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

वेबसाइट द्वारे

तुमची शिल्लक ऑनलाइन तपासण्यासाठी, EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये Download/View Passbook वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्ही शिल्लक पाहू शकता.

Umang अॅपद्वारे

जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही जेव्हा हवे तेव्हा अॅपद्वारे तुमची ईपीएफ शिल्लक तपासू शकता. यासाठी UMANG अॅप ओपन करा आणि EPFO ​​वर क्लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. ते एंटर केल्यानंतर, आपण EPF शिल्लक पाहू शकता.

पैसे आले नाहीत तर कुठे तक्रार कराल

सर्वप्रथम तुम्हाला https://epfigms.gov.in/ या वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी Register Grievance वर क्लिक करावे लागेल. आता एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला पीएफ मेंबर, ईपीएफ पेन्शनर, एम्प्लॉयर असे अनेक पर्याय दिसतील. यातून तुम्हाला पीएफ मेंबर निवडावे लागेल. त्यानंतर UAN नंबर आणि सुरक्षा कोड टाका आणि तपशील घ्या. आता येथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

First published:

Tags: Money, PF Withdrawal