मुंबई, 16 मे: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदर वाढवण्याचा निर्णय रोखून धरला आहे आणि कर्जदारांना थोडा दिलासा दिलाय. तरीही ही स्थगिती किती काळ कायम राहील हे अनिश्चित आहे. रिटेल ग्राहकांसाठी हा आव्हानात्मक काळ आहे, कारण कर्ज महाग झालंय. म्हणजेच त्यांची कर्ज घेण्याची क्षमता कमी होते. याचा परिणाम स्क्वेयर फुटांवर पडतो. जे त्यांना परवडणारे आहे. होम लोन कधी घ्यावं याविषयीच्या टिप्स आपल्याला बँक बाझारचे सीईओ आदिल शेट्टी यांनी दिल्या आहेत.
महागाईवर बँकांची नजर
मार्चमध्ये वार्षिक किरकोळ चलनवाढ मागील महिन्यातील 6.44% वरून 5.66% पर्यंत घसरली आणि गेल्या 15 महिन्यांतील सर्वात कमी आहे. सर्वोच्च बँक महागाईच्या ट्रेंडवर बारकाईने लक्ष ठेवत आहे आणि आगामी मौद्रिक आढावा बैठकीमध्ये व्याजदरांवर सुधारात्मक चर्चा करू शकते. सुधारात्मक उपाययोजना करू शकतात. तुम्ही होम लोनच्या बाजारात असाल तर व्याजदरात चढ-उतार होण्याची अपेक्षा करा. होम लोनमध्ये सामान्यतः फ्लोटिंग व्याजदर असतात जे रेपो रेट बदलल्यावर रीसेट होतात. जे चक्रीय आणि अनिवार्य आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक तयारी. नियोजन करुन निर्णय घेतले तर तुम्ही तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करु शकता.
होम लोन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स
तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करा कर्जाचे दर अनेकदा तुमच्या क्रेडिट स्कोअरशी जोडलेले असतात. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास, तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. ज्यामुळे तुमचे पैसे दीर्घकाळ वाचू शकतात. तथापि, तुमचा क्रेडिट स्कोर खराब असल्यास, तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज मिळू शकते, ज्यामुळे तुमचे कर्ज अधिक महाग होऊ शकते. सहसा 750 चा स्कोअर कोणतेही कर्ज मिळविण्यासाठी पुरेसा असतो. परंतु कर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री चांगली असल्यास कर्ज देणारे त्याला कमी क्रेडिट स्कोअर मानतात. मात्र तुमचा क्रेडिट स्कोअर 750 च्या वर असेल, तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. यासोबतच तुम्ही कमी व्याजदरासाठी वाटाघाटी देखील करू शकता. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे की नाही ते एकदा तपासून घ्या. आपल्या इन्कमचे मूल्यांकन करा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी विचारात घेतली पाहिजे. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर असाल आणि मासिक देयके घेऊ शकत असाल, तर कर्ज मिळवण्यासाठी ही चांगली आहे. कर्ज साधारणपणे तुमच्या संपत्तीच्या किमतीच्या 75-80% कव्हर करते. स्टँप ड्यूटी आणि रजिस्ट्रेशन यांसारखे इतर सर्व खर्च जोडल्यास, तुम्हाला आधारभूत किमतीच्या सुमारे 30-40% खर्च करावा लागू शकतो. तर उर्वरित कर्जाद्वारे कव्हर केले जाऊ शकते. तथापि, जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल आणि तुमच्याकडे मार्जिन तयार नसेल, तर कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही आर्थिक स्थिती चांगली होईपर्यंत वाट पाहणे फायदेशीर ठरतं. संपत्तीची किंमत तुमच्या घराचं लोकेशन सोशल आणि फिजिकल इंफ्रास्ट्रक्चरमुळे जास्त महाग असेल तर जास्त काळ वाट बघितल्याने तुम्हाला संपत्तीसाछी जास्त पैसे खर्च करावे लागतील. कारण घरांच्या किमती सतत वाढत आहेत. ज्यामुळे भविष्यात घर घेणे अधिक कठीण होईल. रिअल इस्टेटच्या किमती व्याजदर खाली येण्याची वाट पाहणार नाहीत. व्याजदर कमी झाले तरी तुमच्या मालमत्तेचे मूल्य वाढू शकते. त्यामुळे, निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला अनेक परिस्थितींचा विचार करावा लागेल.
जास्त काळ वाट पाहू नका
कमी होऊ शकतात व्याजदर नजीकच्या भविष्यात व्याजदर कमी होणे अपेक्षित असल्यास, तुम्ही कर्ज घेण्यापूर्वी वाट पाहू शकता. हे तुम्हाला कमी व्याजदर मिळविण्यात आणि दीर्घकाळासाठी पैसे वाचविण्यात मदत करू शकते. मात्र, हे कधी होईल हे सांगणे फार कठीण असतं. आता, व्याजदर आधीच उच्च चालू आहे. जोपर्यंत महागाई दीर्घ कालावधीसाठी RBI च्या सहनशीलतेच्या पातळीत असते तोपर्यंत कमी व्याजदर मिळण्याची खात्री देता येत नाही. तुम्हाला आता घर विकत घेणे परवडत असल्यास, व्याजदर कमी होण्याची वाट पाहू नका. तुम्ही फ्लोटिंग रेटवर कर्ज घेत असाल, तर रेपो रेट खाली आल्यावर व्याजदर कमी होतील. यामुळे तुमचा कर्जाचा कालावधी आपोआप कमी होईल, जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल. व्याजदरांची तुलना करा कर्जदात्याकडे जाण्यापूर्वी, वेगवेगळ्या बँका किंवा वित्तीय संस्था किती व्याजदराने कर्ज देत आहेत ते तपासा. तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा कारण तुमचा व्याजदर ठरवताना कर्जदार ते तपासत असते. तुमचे उत्पन्न स्थिर असल्यास, कर्ज आणि उत्पन्नाचा अनपात कमी आहे आणि क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर कर्जदाता कमी व्याजदरात कर्ज देतो. कर्जाचे दर शिखरावर असताना कर्ज घेण्याचा किंवा वाट पाहण्याचा निर्णय तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो. ज्यावेळी तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या बजेटचे मूल्यांकन करू शकता आणि तुम्हाला असे वाटते की तुम्ही 10-20 वर्षांच्या EMI मध्ये कोणत्याही विलंब आणि डिफॉल्टशिवाय कर्जाची परतफेड करू शकता हीच कर्ज मिळवण्याची योग्य वेळ आहे. बँक बाझारचे सीईओ आदिल शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे.