मराठी बातम्या /बातम्या /मनी /

786 नंबर असलेली नोट तुमच्या खिशात आहे काय? जाणून घ्या लाखो रुपये कसे मिळतील

786 नंबर असलेली नोट तुमच्या खिशात आहे काय? जाणून घ्या लाखो रुपये कसे मिळतील

जर तुमच्याकडील नोटेवर 786 क्रमांक (786 number series Indian currency) लिहिलेला असेल तर ती नोट जपून ठेवा, कारण या नोटेची विक्री होऊ शकते आणि तिला लाखो रुपयांची किंमत मिळू शकते.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 सप्टेंबर : खिशातील नोटांकडे कधी आपण फार गंभीरतेनं पाहिलं नसेल तर आता ही सवय बदला. कोणताही व्यवहार, खरेदी-विक्री करताना तुम्ही वापरत असेलेल्या नोटांकडे लक्ष द्यायला हवे. कारण एखादी नोट तुम्हाला लखपती बनवू शकते. जर तुमच्याकडील नोटेवर 786 क्रमांक (786 number series Indian currency) लिहिलेला असेल तर ती नोट जपून ठेवा, कारण या नोटेची विक्री होऊ शकते आणि तिला लाखो रुपयांची किंमत मिळू शकते.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अशी नोट विकल्यास तुम्हाला किमान 3 लाख रुपये सहज मिळू शकतात. वास्तविक इस्लाम धर्मामध्ये 786 हा आकडा खूप भाग्यवान मानला जातो. यामुळेच हा आकडा असलेली नोट मिळवण्यासाठी अनेकजण लाखो रुपये देण्यास तयार आहेत.

यासाठी तुमच्याकडे 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 2000 रुपये अशी कोणत्याही मूल्याची नोट असली तरी ती आरामात विकली जाऊ शकते. त्यावरील 786 हा आकडा महत्त्वाचा आहे, तिचे मूल्य कितीही असो अशा नोटेमुळे तुम्हाला लाखो रुपये सहज मिळू शकतात.

हे वाचा - ‘एक विवाह ऐसा भी’! 90 वर्षीय वृद्धानं केलं 75 वर्षाच्या महिलेसोबत लग्न, कारणही आहे अनोखं

अनेक लोकांना जुन्या नोटा आणि नाण्यांचा संग्रह करून ठेवण्याचा छंद असतो. या व्यतिरिक्त यातून भरपूर पैसा देखील मिळवला जाऊ शकतो. कोणाला अशी नोट विकायची असल्यास 'ईबे' या खरेदी-विक्रीच्या वेबसाइटवर जाऊन ही नोट आपण विकू शकतात. जर तुमच्याकडंही अशा नोटा असतील तर लगेच बाहेर काढा आणि ऑनलाईन, ऑफलाईन विक्रीसाठी ठेवा. ज्यामुळं तुमचं नशीब चमकू शकेल.

कसे विकू शकाल?

अशा नोटांचा फोटो काढून विक्रेता म्हणून ऑनलाइन वेबसाइटवर नोंदणी करा आणि नोटेचे फोटो अपलोड करा. ज्यांना या क्रमांकाच्या नोटा खरेदी करण्यात स्वारस्य आहे ते तुमच्याशी थेट संपर्क साधतील. यानंतर आपण वाटाघाटीद्वारे त्यांची किंमत ठरवू शकता. 1994 साली तयार करण्यात आलेल्या 2 रुपयाच्या नाण्यालाही फार मागणी आहे, ज्याच्या पाठिमागं भारताचा झेंडा आहे. क्वीकर वेबसाईटवर या नाण्याची किंमत 5 लाखांपर्यंत मिळू शकते.

(सूचना: ही बातमी अनेक स्त्रोतांमधून माहिती घेऊन केली आहे. मात्र, न्यूज 18 लोकमत कोणत्याही प्रकारे याची हमी देऊ शकत नाही.)

First published: