प्रिंट चलन म्हणजे नोटेच्या मधोमध मेटेलिक दोऱ्याचा उपयोग हा सुरक्षेच्या कारणास्तव सुरु केला गेला होता. त्याच्यावर काही कोड लिहीलेले असतात. जे नोटांना सुरक्षा पुरवतात.
नोटांमध्ये मेटेलिक दोऱ्याचा उपयोग करण्याची कल्पना सर्वात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये 1848 साली आली होती. परंतू याला वापरात आणण्यासाठी शंभर वर्षे लागली. मेटेलिक दोऱ्याचा उपयोग हा नकली नोटांना आळा घालण्यासाठी केला गेला होता.
द इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी म्हणजे (आईबीएनएस-IBNS) नुसार नोटांमध्ये धातुच्या स्ट्रिपचा वापर हा सर्वप्रथम बँक ऑफ इंग्लंडने 1948 साली सुरु केला. तेव्हा नोटेवर एक काळी रेष असायची. याचं कारण बनावट नोटांवर आळा घालणं होतं, परंतू त्यानंतरही बनावट नोट तस्करांनी नोटांवर काळ्या रेषा बनवल्या आणि चलनात आणल्यासुद्धा. त्यामुळे पुन्हा नोटांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला.
बँक ऑफ इंग्लंडने 1948 साली 20 पाऊंडच्या नोटेवर मेटलच्या धागा वापरला. त्यावेळी सगळ्यांना असं वाटलं कि नोटा बनवणारे तस्कर या सुरक्षेला भेदू शकणार नाही. परंतु नंतर बनावट नोटा चलनात आल्या होत्या.
बनावट नोटा चलनात येत असताना धातूच्या नोटा वापरणं बंद केलं नाही, काही देशांनी मेटलच्या जागी प्लास्टिकची स्ट्रीप वापरणं सुरु केलं. 1990 नंतर अनेक देशांनी याच पद्धतीचा वापर सुरु केला. त्याची नकल अजूनही होऊ शकलेली नाही.
ऑक्टोबर 2000 मध्ये भारतात रिजर्व बँक ऑफ इंडियाने 1000 रुपयांची नोट जारी केली, त्यातही याच पद्धतीचा वापर केला गेला. सुरक्षेच्या कारणामुळे 500 आणि 100 च्या नोटांवरही याच पद्धतीच्या स्ट्रीपचा वापर होऊ लागला.
05, 10, 20 आणि 50 च्या नोटांवर याच स्ट्रीपचा वापर होत गेला. त्यावर महात्मा गांधींचा फोटो वापरण्यात आला. साधारण मेटेलिक स्ट्रिप ही पातळ असायची एक तर ती अल्युमिलनीयम किंवा प्लास्टिकची असायची.
भारतात नोटांवर मेटेलिक स्ट्रिपचा वापर फार उशिरा सुरु करण्यात आला. मेटेलिक स्ट्रिप ही लाल आणि सिल्वर रंगाची होती. छोट्या रकमेच्या नोटांवर ती सोनेरी रंगाची तर 2000 आणि 500 च्या नोटांवर हिरव्या रंगाची होती.
मेटेलिक स्ट्रिपचा वापर नोटांच्या आत केल्या जायचा. याला प्रकाशात बघितले तर स्ट्रिप चमकताना दिसते.
जगातील काही मोजक्याच कंपन्या मेटेलिक स्ट्रिप बनवतात. परंतु भारतात नोटांवर असणारी मेटेलिक स्ट्रिप ही विदेशातून मागवली जाते.