• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • ITR New Portal: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी, नवीन ई-फायलिंग पोर्टलमध्ये समस्या असतील तर असं करा ऑनलाइन पेमेंट

ITR New Portal: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी, नवीन ई-फायलिंग पोर्टलमध्ये समस्या असतील तर असं करा ऑनलाइन पेमेंट

Income Tax Return New Portal: जर तुम्हाला नवीन ई-फायलिंग पोर्टलवर टॅक्स फाइल करताना समस्या येत असतील तर तुम्ही या स्टेप्स फॉलो करून तुमचा कर भरू शकता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 जून: आयकर विभागाने अलीकडेच नवीन आयकर ई-फायलिंग पोर्टल  www.incometax.gov.in लाँच केलं आहे. आयटीआर (ITR) कोणत्याही समस्येशिवाय भरता यावा हे या पोर्टलचं उद्दिष्ट्य आहे. सोपा, स्मार्ट आणि सरळ अनुभव ई-फायलिंगवेळी करदात्यांना मिळावा हे या पोर्टलच्या माध्यमातून लक्षात ठेवल्याचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले आहे. दरम्यान असं असलं तरीही पोर्टल लाँच झाल्यानंतर करदात्यांना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलच्या तांत्रिक समस्या अद्याप ठीक करण्यात आलेल्या नाहीत, शिवाय पोर्टलमधील सर्व फीचर्स अद्याप सुरू झालेले नाहीत. अशाप्रकारे करा ITR फाइल Step 1- ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी http://www.tin-nsdl.com वर लॉगइन करा Step 2- त्यानंतर सर्व्हिस सेक्शनमध्ये  ई-पेमेंटवर जा आणि पे टॅक्स ऑनलाइन या पर्यायावर क्लिक करा. वेबसाइटवर देण्यात आलेल्या E-pay tax टॅबमध्ये Click here वर क्लिक करा Step 3- लागू होणारे आयटीएनएस 280, आयटीएनएस 281, आयटीएनएस 282, आयटीएनएस 283 किंवा फॉर्म 26 क्यूबी डिमांड पेमेंट (केवळ मालमत्तेच्या विक्रीवरील टीडीएससाठी) निवडा. हे वाचा-EPFO च्या 6 कोटी सदस्यांसाठी महत्त्वाचे, लवकरच खात्यात येतील PF व्याजाचे पैसे Step 4- पॅन / टॅन (जे लागू होत आहे) असे अन्य अनिवार्य चालान तपशील द्या. जसे करदात्याचा पत्ता, ज्या बँकेद्वारे देय द्यायचे आहे इत्यादी Step 5- भरलेला डेटा सबमिट केल्यावर, एक पुष्टीकरण स्क्रीन दिसेल. पॅन / टॅन आयटीडी पॅन / टॅन मास्टरनुसार वैध असल्यास मास्टर नुसार करदात्याचे संपूर्ण नाव पुष्टीकरण स्क्रीनवर दर्शविले जाईल. Step 6- तुमच्या तपशीलाचे पुष्टीकरण झाल्यानंतर तुम्हाला बँकेच्या नेट बँकिंग साइटवर निर्देशित केलं जाईल. Step 7- करदात्याने नेट-बँकिंगसाठी बँकेद्वारे प्रदान केलेल्या यूजर आयडी- पासवर्डसह नेट-बँकिंगमध्ये लॉग इन करावं लागेल. त्यानंतर बँकेच्या साइटवर देय तपशील भरावा लागेल. Step 8- यशस्वी पेमेंटनंतर एक चालान काउंटर फॉइल प्रदर्शित होईल. ज्यामध्ये सीआयएन, पेमेंट तपशील आणि ई-पेमेंट केलेल्या बँकेचे नाव असेल. ही काउंटर फॉइल पेमेंट केल्याचा पुरावा आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: