नवी दिल्ली, 29 मे: 1 जूनपासून तुमच्याशी थेट निगडीत असणाऱ्या काही नियमांत (Rules Changing from 1st June 2021) बदल होणार आहे. यापैकी हे पाच नियम अत्यंत महत्वाचे आहेत, त्याचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो. यामध्ये बँकिंग (Banking) संबंधित, आयटीआर (ITR Filing) संबंधित आणि एलपीजी गॅस (LPG Gas Price) संबंधित काही नियमात बदल होणार आहे.
1 जूनपासून बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) चेक पेमेंट करण्याची पद्धती बदलणार आहे. शिवाय 1 जूनपासून एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होईल, तुम्ही जर घरगुती एलपीजी गॅस घेत असाल तर तुम्हाला या नवीन किंमतीनुसार खरेदी करावी लागेल.