मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Home Loan Documents : होम लोनसाठी कोणती कागदपत्रं असतात आवश्यक? जाणून घ्या...

Home Loan Documents : होम लोनसाठी कोणती कागदपत्रं असतात आवश्यक? जाणून घ्या...

खरेदी करत असलेल्या मालमत्तेची कागदपत्रंही आवश्यक असतात.

खरेदी करत असलेल्या मालमत्तेची कागदपत्रंही आवश्यक असतात.

खरेदी करत असलेल्या मालमत्तेची कागदपत्रंही आवश्यक असतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : सध्याच्या काळात बहुतांश जण घर खरेदीसाठी गृह कर्ज अर्थात होम लोनचा पर्याय निवडतात. प्रत्येक बॅंक आणि वित्तीय संस्थेचे होम लोनसाठीचे व्याजदर वेगवेगळे असतात. सर्व पूर्वतयारी झाल्यावर आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू होते. याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

होम लोनसाठी आवश्यक कागदपत्रं -

- पूर्ण माहिती भरलेला आणि स्वाक्षरी केलेला होम लोनसाठीचा अर्ज

- तीन पासपोर्ट साइज फोटोग्राफ

- ओळखीचा पुरावा

- रहिवासी पत्त्याचा पुरावा

- गेल्या सहा महिन्यांचं बॅंक अकाउंट स्टेटमेंट

- अर्जदाराच्या बॅंकर्सद्वारे स्वाक्षरीची पडताळणी

- दायित्व विवरण आणि वैयक्तिक मालमत्ता

- मालमत्तेच्या तपशीलाची कागदपत्रं

- वेतन प्रमाणपत्राची मूळ प्रत (नोकरदार वर्गासाठी)

- फॉर्म 16/ आधीच्या दोन वर्षांचा आयटी रिटर्न तपशील (नोकरदार वर्गासाठी)

- आधीच्या तीन वर्षांचा आयटी रिटर्न आणि अ‍ॅसेसमेंट ऑर्डर्स कॉपीज (व्यावसायिक)

- आगाऊ आयकर पेमेंटचा पुरावा म्हणून चलन (व्यावसायिक)

- व्यवसायाच्या ठिकाणाच्या पत्त्याचा पुरावा (व्यावसायिक)

- आधीच्या तीन वर्षांचा आयटी रिटर्न/अ‍ॅसेसमेंट ऑर्डर कॉपीज (व्यावसायिक)

- आगाऊ आयकर पेमेंटचा पुरावा म्हणून चलन (व्यावसायिक)

होम लोनचा अर्जदार अनिवासी भारतीय असेल तर त्याला आणखी कागदपत्रं सादर करावी लागतात. ती पुढीलप्रमाणे

- केवायसी (KYC) डॉक्युमेंट्स

- नोकरदार असल्यास वेतन प्रमाणपत्र. यावर पासपोर्टप्रमाणे इंग्रजीत नाव असावं. त्याचप्रमाणे पद, पासपोर्ट क्रमांक, डेट ऑफ जॉयनिंग, सध्याचं वेतन याचा तपशील असावा.

- अलीकडच्या 3 ते 6 महिन्यांच्या वेतन स्लिप.

- आयकर परतावा तपशील (देशात आयकर भरणारे असल्यास)

- व्यावसायिकांसाठी व्यवसायाची कागदपत्रं (व्यापार परवाना, प्रायोजक करार, मुखत्यारपत्र)

- निवासी व्हिसाचं पृष्ठ दर्शवणारी पासपोर्टची प्रत

- रहिवासी देशाच्या सरकारने जारी केलेला रोजगाराचा पुरावा (वर्क परमिट, कामगार करार आदी)

- भारतीय आर्किटेक्टकडून अंदाजे खर्चाच्या तपशीलासह मालमत्तेशी संबंधित कागदपत्रं

- पगारदार एनआरआयसाठी पगार क्रेडिट किंवा भारतात पैसे पाठवण्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्यास दूतावासातल्या अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली उत्पन्नाची कादगपत्रं आवश्यक असतात

- आधीच्या 6 महिन्यांतलं परदेशातलं बॅंक स्टेटमेंट

- एनआरओ किंवा एनआरई बॅंकेचं आधीच्या 6 महिन्यांतलं स्टेटमेंट

- कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना अर्जदार देशात उपलब्ध नसल्यास त्यांच्या वतीने काम करणाऱ्या पॉवर ऑफ अॅटर्नीचा तपशील सादर करणं आवश्यक

हेही वाचा - जुनं घर विकून नवीन खरेदी करताय? कसा वाचेल तुमचा Tax?

होम लोनच्या अर्जासाठी आवश्यक केवायसी कागदपत्रं

- फोटो पुरावा म्हणून पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा व्होटर्स आयडी कार्ड यांपैकी एक डॉक्युमेंट गरजेचं

- रहिवासी पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, एम्प्लॉयमेंट लेटर, पत्ता नमूद असलेलं बॅंकेचं पासबुक किंवा स्टेटमेंट यांपैकी एक डॉक्युमेंट गरजेचे.

- वयाचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, पासपोर्ट, जन्मदाखला, ड्रायव्हिंग लायसन्स, बॅंक पासबुक किंवा इयत्ता 10 वीची मार्कशीट यांपैकी एक डॉक्युमेंट गरजेचं.

कर्ज हमीदाराची कागदपत्रंदेखील होम लोनसाठी अर्ज सादर करताना द्यावी लागतात. त्यात दायित्व विवरण आणि वैयक्तिक मालमत्ता, दोन पासपोर्ट साइज फोटो, ओळखीचा पुरावा, रहिवासी पत्त्याचा पुरावा, व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा, सध्याच्या बॅंकेकडून ओळख पटवलेली स्वाक्षरी यांचा समावेश असतो.

खरेदी करत असलेल्या मालमत्तेची कागदपत्रंही आवश्यक असतात. ती अशी -

सहकारी गृह सोसायटी असेल तर सेल डीड, सेल अ‍ॅग्रीमेंट किंवा शेअर सर्टिफिकेट, बिल्डिंग किंवा जमिनीचा कर भरल्याची पावती, ताबा मिळाल्याचं प्रमाणपत्र, मालमत्तेचा महसूल विभागाने मंजूर केलेला नकाशा, बिल्डर, हाउसिंग बोर्ड किंवा सोसायटीकडून मिळालेलं अलॉटमेंट लेटर, फ्लॅट खरेदीच्या आगाऊ पेमेंटच्या पावत्या, योग्य प्राधिकरणाचं परवानगी पत्र, इमारतीचा मंजूर प्लॅन (फ्लॅट खरेदीसाठी मजल्याच्या प्लॅनसह), यूएलसी कायदा 1976 अंतर्गत जारी केलेलं मूळ ना हरकत प्रमाणपत्र, बिल्डर किंवा हाउसिंग सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र, जमिनीचं NA प्रमाणपत्र, कन्स्ट्रक्शन कॉस्टचा सविस्तर तपशील, प्लॉट खरेदी करताना कर्जदाराने घर बांधण्याची नमूद केलेली तारीख, वकिलाचा स्टँडर्ड फॉरमॅटमधला अहवाल, मालमत्तेची मूळ कागदपत्रं जमा करण्यासाठी मुखत्यारपत्र

First published:

Tags: Home Loan, Money