मुंबई, 4 सप्टेंबर: जुनं घर विकून नवीन विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला आयकराचे नियम माहित असणं आवश्यक आहे. विक्री आणि खरेदी हा मोठा व्यवहार असतो आणि यामध्ये तुमचं उत्पन्नही वाढतं. त्यामुळं तुमचा टॅक्स ब्रॅकेट वाढू शकतो. त्या वाढीव श्रेणीनुसार तुम्ही कर भरला नाही, तर कर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो. त्यामुळे जुनं घर विकल्यानंतर तुम्ही नवीन खरेदी करत असाल, तर पुढं काय करायचं याबाबत कर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. याच्याशी संबंधित असाही प्रश्न आहे की वारसाहक्कानं मिळालेल्या मालमत्तेवर आयकर कायदा काय सांगतो? ते विकल्यावर कोणते कर नियम लागू होतील?
सर्व प्रथम, वारसा मिळालेल्या मालमत्तेबद्दल बोलूया. याबाबत सीए आणि कर तज्ज्ञ यतिंदर खेमका सांगतात की, जेव्हा आपल्याला वारसा हक्काने मालमत्ता मिळते, तेव्हा ती घेताना त्यावर कोणताही कर लागत नाही आणि त्यावर आयकराचा कोणताही नियम लागू होत नाही. तथापि, काही राज्य सरकारांमध्ये अशा मालमत्तांच्या कागदपत्रांसाठी शुल्क आकारले जाते. पण त्याचा कराशी काहीही संबंध नाही. अशी मालमत्ता पूर्णपणे कराच्या पलीकडे आहे.
वारशानं मिळालेल्या मालमत्तेवर कर-
एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेतून, जसे की भाड्याने मिळणारे उत्पन्न असल्यास, त्या उत्पन्नावर कर आकारला जाईल का? याबाबत कर तज्ज्ञ खेमका म्हणतात, जर तुमच्याकडे अशी मालमत्ता असेल ज्यातून उत्पन्न मिळत असेल तर ते उत्पन्न तुमचेच मानले जाईल. त्यानंतर तुम्हाला त्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला भेट म्हणून शेअर किंवा एफडी मिळाली असेल, तर तुम्हाला त्यावरील कमाईवरही कर भरावा लागेल.
हेही वाचा: Investment Tips: मंदीत संधी! ‘या’ तीन प्रकारे करा गुंतवणूक, होणार नाही आर्थिक नुकसान
भांडवली नफ्यावर कर गणना-
जर तुम्ही वारसा मिळालेली मालमत्ता विकत असाल तर त्यावर दीर्घकालीन किंवा अल्प मुदतीच्या आधारावर कर लावण्याची तरतूद आहे. याला कॅपिटल गेन टॅक्स म्हणतात. मालमत्तेच्या विक्रीवर भांडवली नफ्याच्या आधारावर कर मोजला जातो आणि त्या आधारावर कर जोडला जातो. तथापि यावर कर वाचवण्याचीही तरतूद आहे. ज्यामध्ये काही अटी लक्षात घेऊन भांडवली नफ्यावर कर वाचवता येतो. याबाबत करतज्ज्ञ खेमका सांगतात की, समजा तुम्ही वारसा हक्काने मिळालेले घर विकले असेल आणि त्यावर भांडवली नफा झाला असेल, तर त्यावर कर वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विक्रीच्या पैशातून नवीन घर घेणे.
आयटीआरमध्ये कमाई दाखवणे आवश्यक आहे-
वारसा हक्कानं मिळालेली मालमत्ता विकून मिळालेले उत्पन्न आयकर विवरणपत्रात दाखवले नाही तर काय होईल हा पुढचा प्रश्न आहे. यासाठी कर विभाग काही कारवाई करू शकतो का? कोणत्याही मालमत्तेच्या विक्रीवर भांडवली नफा झाला असेल तर तो आयटीआरमध्ये दाखवला जाणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो. असा व्यवहार तुमच्या वार्षिक माहिती स्टेटमेंटमध्ये दिसून येईल आणि त्यानुसार, आयटीआर न आढळल्यास, कर विभागाकडून कारवाई केली जाईल. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भांडवली नफ्यावर कर भरणे आणि तो ITR मध्ये दाखवणे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax, Property