Home /News /money /

घरबसल्या करता येणाऱ्या मायक्रोग्रीन शेतीबद्दल माहिती आहे का? कमाईचा चांगला पर्याय

घरबसल्या करता येणाऱ्या मायक्रोग्रीन शेतीबद्दल माहिती आहे का? कमाईचा चांगला पर्याय

मार्केटमध्ये मागणी वाढल्यामुळे कित्येक लोक याचा व्यवसाय करून दरमहा लाखो रुपये कमवत आहेत

    नवी दिल्ली : घरबसल्या पैसा कमवण्याचे काही मार्ग तुम्ही शोधत आहात का? (earn money from home) मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही आज तुम्हाला असा बिझनेस प्लॅन (business idea) सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरी बसून दररोज पैसे कमवू शकाल. कोरोना काळात लोक आरोग्य आणि पोषणावर अधिक लक्ष देत आहेत. त्यामुळेच मायक्रोग्रीन या सुपर फूडची (Micro green) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फळ आणि भाज्यांच्या तुलनेत या मायक्रोग्रीनमध्ये ४० पट अधिक पोषक तत्त्वं असतात. त्यामुळेच याला सुपरफूड (Super food business) असं म्हणतात. मार्केटमध्ये मागणी वाढल्यामुळे कित्येक लोक याचा व्यवसाय करून दरमहा लाखो रुपये कमवत आहेत. या व्यवसायाबाबत जाणून घेऊ या. मायक्रोग्रीन म्हणजे काय? कोणत्याही झाडाच्या सुरुवातीच्या कोवळ्या पानांना मायक्रोग्रीन म्हणतात. ही पानं दोन ते तीन इंच लांब असतात. ही पानं उगवल्यानंतर एवढी लहान असतानाच त्यांना तोडून बाजूला केलं जातं. या कोवळ्या पानांपासून एवढं पोषण मिळतं, की दररोज केवळ ५० ग्रॅम मायक्रोग्रीन्स सेवन केल्यामुळे पोषणाच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात. यासाठी मुळा, मोहरी, मूग या झाडांच्या कोवळ्या पानांचा वापर केला जातो. हे वाचा - कोरोना-प्रूफ कपड्यांचा दावा करणाऱ्या कंपनीला ऑस्ट्रेलियात 3.7 मिलियन डॉलर्स दंड मायक्रोग्रीन शेती कशी कराल? मायक्रोग्रीन शेतीची सर्वांत मोठी खासियत म्हणजे, यासाठी तुमच्याकडे शेतजमीन असण्याची गरज नाही. अगदी आपल्या घराच्या टेरेसवर, बाल्कनीमध्ये किंवा चक्क बेडरूममध्येही तुम्ही ही शेती करू शकाल. यासाठी तुम्हाला ट्रे, बियाणं, जैविक खत आणि माती किंवा कोकोपीटची गरज भासते. झाडांना सूर्यप्रकाशाची गरज असल्यामुळे आपण ती उन्हात ठेवतो; मात्र मायक्रोग्रीन शेतीसाठी झाडांना प्रखर सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. दररोज काही प्रमाणात पाणी शिंपडल्यानंतर काही दिवसांमध्येच रोपं उगवण्यास सुरुवात होते. यासाठी मुळा, गाजर अशी कंदमुळं किंवा इतर भाज्यांचाही वापर करता येतो. मायक्रोग्रीन शेतीसाठी तुम्हाला जास्त प्रमाणात खर्च करण्याची गरज नाही; मात्र यातून चांगल्या प्रमाणात पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला ते योग्य प्रकारे विकता यायला हवं. (Microgreen business) दोन ते तीन आठवड्यांमध्येच हे मायक्रोग्रीन पीक काढणीसाठी तयार होतं. यानंतर तुम्हाला 5 स्टार हॉटेल, कॅफे आणि सुपरमार्केट्समध्ये हे विकावं लागणार आहे. पॅकिंगमध्ये न विकता केवळ हॉटेल आणि कॅफेंनाही तुम्ही याचा पुरवठा करू शकता. किंवा मग तुम्हाला शक्य असेल, तर स्वतःचं दुकान आणि ब्रँड सुरू करूनही तुम्ही याचा व्यवसाय करू शकता. अशा प्रकारे शेतीची थोडीशी माहिती आणि अगदी कमी जागा व खर्च एवढ्या भांडवलावर तुम्ही यशस्वीपणे हा व्यवसाय करू शकाल.
    First published:

    Tags: Career opportunities, Money

    पुढील बातम्या