मराठी बातम्या /बातम्या /Viral /

झेब्राच्या पिल्लावर वाघिणीचा हल्ला, जीवावर उदार होत आईनं दिली झुंज, पाहा VIDEO

झेब्राच्या पिल्लावर वाघिणीचा हल्ला, जीवावर उदार होत आईनं दिली झुंज, पाहा VIDEO

आपल्या पिल्लावर हल्ला करणाऱ्या वाघिणीच्या (Zebra saved her baby from Tiger video goes viral) तावडीतून त्याला सोडणाऱ्या झेब्राचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

  • Published by:  desk news

आपल्या पिल्लावर हल्ला करणाऱ्या वाघिणीच्या (Zebra saved her baby from Tiger video goes viral) तावडीतून त्याला सोडणाऱ्या झेब्राचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या मुलासाठी आई काय करू शकते, याचं उदाहरणच सध्या व्हायरल (Mother and child relation) होत असलेल्या या व्हिडिओतून दिसून येत आहे. या व्हिडिओवर सध्या (Zebra and Tiger video gets viral) नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

झेब्राच्या पिल्लावर वाघिणीचा हल्ला

शिकारीच्या शोधात असलेल्या वाघिणीनं झेब्राच्या पिल्लावर हल्ला केल्याचं या व्हिडिओत दिसतं. वाघिण जेव्हा एखाद्या प्राण्यावर हल्ला करते, तेव्हा आपले दात तिच्या मानेत घुसवते. आपली नखं आणि दात यांचा वापर करून समोरच्या प्राण्याला गुडघ्यावर आणते आणि मग शिकार करते. एखाद्या प्राण्याच्या मानेवर वार केल्यानंतर तो प्राणी अर्धमेला होतो आणि त्याची शिकार करणं सोपं जातं. त्यासाठी वाघ किंवा सिंह हे प्रत्येक प्राण्याच्या मानेला निशाणा बनवताना दिसून येतात.

पिल्लाची शिकार होणार तेवढ्यात..

वाघिणीने झेब्राच्या पिल्लाचा ताबा घेतलाच होता. त्याच्या मानेचा घोट घेऊन त्याला ठार करण्याच्या बेतात ती असतानाच झेब्राच्या आईने वाघिणीला जोरदार लाथ मारून मागे ढकलले. अचानक झालेल्या या हल्ल्याने वाघिणही काहीशी चपापली. मात्र वाघिण प्रचंड भुकेली असल्याने तिने आपली शिकार न सोडण्याचा निर्णय़ घेतला आणि पुन्हा एकदा पिल्लावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा- 'बडे अच्छे लगते है' श्रुती मराठेच्या वेस्टर्न LOOK वर चाहते फिदा; दिल्या जबरदस्त

झेब्राने दिली झुंज

शिकार करणाऱ्या वाघिणीला झेब्रानं चांगलीच झुंज दिली. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करता तिने वाघिणीसोबत संघर्ष सुरू ठेवला. झेब्राचा जोष पाहून वाघिणही मग गांगरली आणि तिने माघार घेतली. त्यानंतर आपल्या पिल्लाला घेऊन झेब्रानं तिथून काढता पाय घेतला. आपल्या डोळ्यांदेखत आपली शिकार घेऊन जाणाऱ्या झेब्राकडे पाहत राहण्याशिवाय वाघिणीकडे कुठलाच पर्याय उरला नाही.

First published:

Tags: Tiger, Tiger attack