Home /News /money /

Aadhaar Card : निळं आधारकार्ड कुणाला मिळतं? कधीपर्यंत असते वैधता?

Aadhaar Card : निळं आधारकार्ड कुणाला मिळतं? कधीपर्यंत असते वैधता?

UIDAI 5 वर्षाखालील मुलांसाठी बाल आधार कार्ड जारी करते. जरी ते इतर आधार कार्ड प्रमाणेच असले तरी त्याचा रंग बदलून निळा करण्यात आला आहे. कोणतेही पालक वैध कागदपत्रे देऊन त्यांच्या मुलांचे आधार कार्ड बनवून घेऊ शकतात.

    मुंबई, 23 जानेवारी : आधार कार्ड (Adhaar Card) ही आता प्रत्येक भारतीयाची ओळख बनली आहे. सरकारी योजनांचा (Government scheme) लाभ घ्यायचा असेल किंवा पासपोर्ट वगैरे घ्यायचा असेल तर ते आधार कार्डशिवाय शक्य होणार नाही. त्यावर लिहिलेला 12 अंकांचा विशेष क्रमांक (Adhaar Number) वगळता सर्वांचे आधार कार्ड सारखेच आहे. पण, UIDAI मुलांसाठी जारी केलेल्या आधार कार्डचा रंग निळा ठेवला आहे. UIDAI 5 वर्षाखालील मुलांसाठी बाल आधार कार्ड जारी करते. जरी ते इतर आधार कार्ड प्रमाणेच असले तरी त्याचा रंग बदलून निळा करण्यात आला आहे. कोणतेही पालक वैध कागदपत्रे देऊन त्यांच्या मुलांचे आधार कार्ड बनवून घेऊ शकतात. UIDAI आधार बनवण्यासाठी 31 प्रकारचे ओळख पुरावे, 44 प्रकारचे पत्त्याचे पुरावे, 14 प्रकारचे नातेसंबंधांचे पुरावे आणि 14 प्रकारचे जन्म प्रमाणपत्र स्वीकारते. तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी आधार कार्ड बनवायचे असेल, तर तुम्ही यापैकी कोणत्याही कागदपत्रांसह UIDAI च्या वैध केंद्रांवर अर्ज करू शकता. क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरताय तरी खराब होतोय Credit Score; लोनसाठी होतेय अडचण, वाचा सविस्तर मुलांसाठी आधार कार्डची विशेष वैशिष्ट्ये >> मुलाचे वय पाच वर्षे पूर्ण होताच हे आधार कार्ड अवैध होईल. >> आधार तयार करण्यासाठी मुलाचा शाळेचा आयडी देखील वापरला जाऊ शकतो. >> मुलाचे वय 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्याचा बायोमेट्रिक आधार डेटा अपडेट करा, तो 15 वर्षांचा झाल्यावर पुन्हा अपडेट करणे आवश्यक आहे. >> मुलाचे आधार बनवण्यासाठी हॉस्पिटलमधून जन्म प्रमाणपत्र किंवा डिस्चार्ज स्लिप पुरेसे आहे. >>पाच वर्षापर्यंत बनलेल्या आधारमध्ये मुलाचे बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन केले जात नाहीत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Aadhar card, Identity verification

    पुढील बातम्या