मराठी बातम्या /बातम्या /मनी /

OYO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, भारतासह दक्षिण आशियात कंपनीने घेतला मोठा निर्णय

OYO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, भारतासह दक्षिण आशियात कंपनीने घेतला मोठा निर्णय

वार्षिक 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन कपात 1 ऑगस्ट 2020 पासून मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती OYOच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

वार्षिक 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन कपात 1 ऑगस्ट 2020 पासून मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती OYOच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

वार्षिक 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन कपात 1 ऑगस्ट 2020 पासून मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती OYOच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

    नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus in India) भारतातील व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे बहुतेक कंपन्या एकतर पगार कापत (Salary Cut) आहेत किंवा कर्मचाऱ्यांना थेट कामावरून कमी करत (Layoffs) आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठं संकट ओढावलं होतं. पण यासंबंधी आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. हॉटेल सुविधा देणाऱ्या OYOने 1 ऑगस्ट 2020 पासून भारतासह दक्षिण आशियामधील (South Asia) आपल्या (Regular Employees) नियमित कर्मचार्‍यांना पूर्ण वेतन देणार असल्याचं जाहीर केलं आहे. 1 ऑगस्टपासून पुन्हा मिळणार 8 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाची वेतन कपात कोविडच्या संकटामुळे OYOने त्यांच्या कर्मचार्‍यांचे पगार कमी करणे किंवा त्यांना पगाराशिवाय रजेवर पाठवणं यासारखे कठोर नियम जारी केले होते. वार्षिक 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन कपात 1 ऑगस्ट 2020 पासून मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती OYOच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. उर्वरित कर्मचार्‍यांचे वेतन कपातही ऑक्टोबर 2020 पासून टप्प्याटप्प्याने काढून घेण्यात येणार आहे. कोल्हापूरचे दृश्य पाहून येईल महापुराची आठवण, पाण्याचा भीषण VIDEO ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार 25 टक्के अर्ध्या पगाराची टक्केवारी एप्रिल-जुलै 2020 मध्ये सर्व कर्मचार्‍यांच्या पगारात 25 टक्के कपात करण्याची मागणी हॉटेलकडून करण्यात आली होती. 25 टक्के वेतन कपातीपैकी 12.5 टक्के ऑक्टोबर 2020 पासून होणार आहे. तर, उर्वरित 12.5 टक्के डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात येईल. भारत आणि दक्षिण आशिया कंपनीचे सीईओ रोहित कपूर (CEO Rohit Kapoor) यांनी कर्मचार्‍यांसह टाऊनहॉल बैठकीत याची घोषणा केली. मुंबईकरांसाठी पुढचे 24 तास अतिशय धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा एलडब्ल्यूपीला पाठवलेल्या सुविधा कर्मचार्‍यांना मिळणार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बर्‍याच कर्मचार्‍यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं. त्यानंतर भारतातील कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये 25 टक्क्यांनी कपात केली. पण, पाच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कर्मचार्‍यांवर पगाराच्या कपातीचा परिणाम वर्षाकाठी झाला नाही. वेतनाशिवाय रजेवर पाठवलेल्या कर्मचार्‍यांना वैद्यकीय विमा व पॅटर्नल विमा, शालेय फी भरपाईची सुविधा सुरू ठेवण्यात आली. तर अनपेक्षित वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर वैद्यकीय विमा व्यतिरिक्त मदत देण्यात येईल असं कंपनीने जाहीर केलं होतं.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या