Live वर्ल्ड कप स्वस्तात बघण्यासाठी जिओनं आणलाय नवा डेटा पॅक

Live वर्ल्ड कप स्वस्तात बघण्यासाठी जिओनं आणलाय नवा डेटा पॅक

यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाइलवर सगळ्या वर्ल्ड कप मॅचेस LIVE पाहता येतील. तुम्ही त्यासाठी हाॅटस्टारचे मेंबर असण्याचीही गरज नाही.

  • Share this:

मुंबई, 04 जून : रिलायन्स जिओनं नवा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणलाय. यात जिओ क्रिकेट सिझन डेटा पॅक 251 रुपयांना मिळतोय. यात तुम्हाला 102GB डेटा मिळेल. तो 51 दिवसांसाठी व्हॅलिड असेल. यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाइलवर सगळ्या वर्ल्ड कप मॅचेस LIVE पाहता येतील. तुम्ही त्यासाठी हाॅटस्टारचे मेंबर असण्याचीही गरज नाही.

ICC Cricket World Cup 2019 पाहण्यासाठी तुम्ही हाॅटस्टार आणि जिओ टीव्ही हे पर्याय निवडू शकता. पण जिओ युजर्सनी हा प्लॅन रिचार्ज केला तर काहीही सबस्क्राइब न करता क्रिकेटचे सामने पाहू शकता. शिवाय त्यांनी जिओ टीव्ही अॅप डाऊनलोड करावं, म्हणजे हाॅटस्टारमार्फत ते वर्ल्ड कपचे सामने Live पाहू शकतात.हा प्लॅन घेणारे युजर्सना जिओ क्रिकेट प्ले अलाँगही मिळू शकतं. हे आहे रिलायन्स जिओचं आॅनलाइन फँटसी क्रिकेट गेम. यात युजर मॅच कोण जिंकेल याचा अंदाज सांगून तो अचूक ठरला तर रिवाॅर्डस् आणि पाॅइंट मिळवू शकतात.

ग्राहकांसाठी आता सोपं होणार ऑनलाइन शॉपिंग! मोदी सरकारनं बनवले नवे नियम

आता रोबोट होतील तुमचे बाॅस, इंटरव्ह्यूमध्ये अशी घेतील परीक्षा

जिओ क्रिकेट सिझन डेटा पॅक 251 रुपयांना मिळेल. त्यात नेहमीप्रमाणे अमर्यादित काॅल्स आणि SMS या सुविधाही आहेत. जिओच्या म्हणण्याप्रमाणे युजरचे या प्लॅनमुळे 365 रुपये वाचतील.

मध्यंतरी,जिओनं मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तसंच वेब-आधारित सेवा (www.jionews.com) नव्या स्वरूपात तुमच्या भेटीला आणली. त्यामुळे प्रत्येक बातमीची अपटेड मिळणं आता आणखी सोपं झालं आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक 2019, आयपीएल 2019, क्रिकेट वर्ल्डकप 2019 प्रत्येक बातमी आता एकाच ठिकाणी मिळाली. ब्रेकिंग न्यूज, लाइव्ह टीव्ही, व्हिडिओ, मासिके, वृत्तपत्रे आणि बऱ्याच गोष्टीं या ठिकाणी उपलब्ध  आहेत.

2.60 लाख रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा दर महिन्याला 40 हजार रुपये

12 पेक्षा अधिक भारतीय भाषा

12 पेक्षा जास्त भारतीय भाषांमधून वाचकांना सर्व गोष्टींची अपडेट मिळतेय. 150 पेक्षा जास्त लाइव्ह चॅनेल, 800 पेक्षा अधिक मासिके, 250 पेक्षा जास्त वृत्तपत्रे, प्रसिद्ध ब्लॉग आणि भारत आणि जगभरातील बातम्यांच्या वेबसाइट्स या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतात. राजकारण, क्रीडा, मनोरंजन, व्यवसाय, तंत्रज्ञान, फॅशन, करिअर, आरोग्य, ज्योतिषशास्त्र, आर्थिक अशा एका ना अनेक प्रकारच्या अपडेट्स युजर्सना उपलब्ध होतात.


VIDEO : उरणमध्ये दहशतवाद्यांचा धमकीचा मेसेज, धोनीचाही केला उल्लेख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 07:37 PM IST

ताज्या बातम्या