मुंबई 04 सप्टेंबर : भारतीय ज्याची इतक्या दिवसापासून प्रतिक्षा करत होते. ती वेळ आता जवळ आली आहे. रिलायन्स जिओने भारतात आपली True 5G सेवा जाहीर केली आहे, जी 5 ऑक्टोबरपासून लाँच होणार आहे. परंतू Jio ही सुविधा काही ठराविक शहरांमध्ये लाँच करणार होते आणि आता त्या शहरांची नावं समोर आले आहेत. ही सुविधा मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांमध्ये सुरू होणार आहे. Jio च्या True 5G सेवेची बीटा चाचणी सध्याच्या Jio वापरकर्त्यांना आमंत्रणाद्वारे ऑफर केली जाईल. Jio True 5G च्या बीटा ट्रायलचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना 1Gbps पर्यंत डेटा स्पीड मिळेल. आता ही सुविधा कशी मिळणार आणि ती कसं वापरू शकणार जाणून घेऊ - ज्या वापरकर्त्यांना Jio 5G वेलकम ऑफरची चाचणी घेण्यासाठी आमंत्रित केले जाईल त्यांना Jio True 5G सेवेमध्ये स्वयंचलितपणे अपग्रेड केले जाईल. - तसेच या आमंत्रित केल्या गेलेल्या लोकांना 5G-सक्षम स्मार्टफोनवर 5G सेवा मिळविण्यासाठी नवीन सिमची आवश्यकता नाही. - जिओने त्यांच्या हँडसेटवर Jio 5G सक्षम करण्यासाठी फोन निर्मात्यांसोबत काम सुरू केले आहे. हे वाचा : 5G Launch In India Benefits : 5G सेवेमुळे आयुष्य 360 डिग्री बदलणार, तुम्हाला कसा होणार फायदा पाहा रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी हे 5G सेवेबद्दल सांगताना म्हणाले की, “जिओने आपल्या देशासाठी महत्त्वाकांक्षी आणि सर्वात वेगवान 5G रोल-आउट योजना तयार केली आहे. 5G ही विशेष सुविधा असलेल्या काही लोकांसाठी किंवा आमच्या सर्वात मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेली विशेष सेवा राहू शकत नाही. ते भारतातील प्रत्येक नागरिकासाठी, प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक व्यवसायासाठी उपलब्ध असले पाहिजे.” Jio 5G बीटा चाचणी सेवा इतर शहरांमध्ये आणणार आहे कारण नेटवर्क जमिनीवर तैनात करण्यासाठी तयार आहे. शहरातील नेटवर्क कव्हरेज पूर्ण होईपर्यंत वापरकर्त्यांसाठी बीटा चाचणी सुरू राहील. जिओचा दावा आहे की त्यांच्या 5G सेवेचा वापरकर्त्यांना तिप्पट फायदा होईल. तसेच जिओ नेटवर्क स्टँड-अलोन आर्किटेक्चरवर तयार केले गेले आहे, ज्याचा अर्थ 4G नेटवर्कवर शून्य अवलंबित्व आहे. हे वाचा : 5G Launching Updates: सर्वसामान्य लोकांना कधी मिळणार 5G सुविधा? Jio कडे 5G स्पेक्ट्रमचे मिश्रण देखील आहे, जे या वर्षाच्या सुरुवातीला 5G स्पेक्ट्रम लिलावादरम्यान विकत घेतले होते. 700 MHz लो-बँड स्पेक्ट्रम असलेला Jio हा एकमेव ऑपरेटर आहे जो चांगल्या इनडोअर 5G कव्हरेजचे वचन देतो. Airtel ने 5G आधीच 8 शहरांमध्ये लॉन्च केले गेले आहे, आणि Vodafone Idea लवकरच भारतात 5G सेवा जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.