मराठी बातम्या /बातम्या /मनी /नादखुळा! 15 हेलिकॉप्टर, 2 हजार कॅब; देशातील सर्वात महागडं लग्न, पाहून डोळेही दिपतील

नादखुळा! 15 हेलिकॉप्टर, 2 हजार कॅब; देशातील सर्वात महागडं लग्न, पाहून डोळेही दिपतील

या लग्नाचे फोटो आणि शाही थाट पाहून डोळेही दिपतील असं हे लग्न नुकतंच पार पडलं या लग्नाची देशभरात चर्चा होत आहे.

या लग्नाचे फोटो आणि शाही थाट पाहून डोळेही दिपतील असं हे लग्न नुकतंच पार पडलं या लग्नाची देशभरात चर्चा होत आहे.

या लग्नाचे फोटो आणि शाही थाट पाहून डोळेही दिपतील असं हे लग्न नुकतंच पार पडलं या लग्नाची देशभरात चर्चा होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Karnataka, India

मुंबई : लग्न करायचं म्हटलं की पहिला विचार येतो खर्च आणि त्यामुळे येतं टेन्शन. लग्नाचा खर्च किती असेल जास्तीत जास्त 50 ते 60 लाख होऊ शकतो असा तुम्ही विचार कराल मात्र इथे तर कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रॅण्ड वेडिंग करण्यात आलं आहे. या लग्नाचे फोटो आणि शाही थाट पाहून डोळेही दिपतील असं हे लग्न नुकतंच पार पडलं या लग्नाची देशभरात चर्चा होत आहे.

या लग्नासाठी चक्क 15 हेलिकॉप्टर आणि 2000 हजार गाड्या बोलवण्यात आल्या होत्या. वधूच्या कपड्यांची आणि दागिन्यांची किंमत ऐकूनच धक्का बसेल असा शाही थाट जणून या लग्नात प्रत्येकानं पाहिला आणि अनुभवला होता. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी रेड्डी हिच्या लग्नाची पत्रिका वाटली तेव्हाच हे लग्न चर्चेत आलं. लग्नपत्रिकेत एक बॉक्स असायचा ज्यात एलसीडी स्क्रीनवर व्हिडीओ संदेशाद्वारे पाहुण्यांना आमंत्रण करण्यात आलं होतं. याशिवाय बंगळुरू पॅलेस ग्राऊंडमध्ये भव्य सेट तयार करण्यात आले होते. लग्नाच्या तयारीसाठी बंगळुरू पॅलेसला आलिशान पॅलेसप्रमाणे सजवण्यात आले आहे.

'ही' आहे घरबसल्या कमाई करण्याची सोपी पद्धत, यासाठी तरुणाने परदेशातील नोकरीही सोडली!

रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नाला 7 वर्षे उलटून गेली आहेत आणि ते लग्न स्वप्नापेक्षा कमी नव्हते. राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आणि जगाचे लक्ष या लग्नाकडे लागले होतं. कारण लग्नात एवढा पैसा खर्च झाला होता की 2000-2000 रुपयांच्या नोटांची संख्या सामान्य माणसालाही सांगता येणार नाही. तुमचा विश्वास बसणार नाही, पण फक्त वधूची साडी 17 कोटींची होती. आणि तिने घातलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 90 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे.

देशात यापूर्वी कधीही असा विवाह झाला नव्हता. हा लग्नसोहळा 6 नोव्हेंबर 2016 रोजी पार पडला. हा विवाह एवढा गाजला होता त्याची चर्चा तर आजही जगभरात होत आहे. विरोधी पक्षांनी हा मुद्दा संसदेत उचलून धरला आणि त्यानंतर जनार्दन रेड्डी यांची चौकशी झाली.

Gold-Silver Rate Today in Nashik : पाडव्यापूर्वी सोन्यानं गाठला उच्चांक, नाशिककरांचा खिसा होणार चांगलाच रिकामा!

जनार्दन रेड्डी यांच्यावर खनन घोटाळ्याचे आरोप होते. या आरोपांतर्गत त्यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली होती. कर्नाटकमध्ये ते भाजपकडून मंत्री होते. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात केलेल्या खर्चावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नात  50,000 हून अधिक पाहुणे आले होते. 40 लग्झरी बैलगाडी, भल्यामोठ्या गाड्या आणि 15 हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. या लग्नाची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर या लग्नावर झालेल्या खर्चावरील रेड्डी यांना उत्तर देता देता नाकीनऊ आले होते.

First published:
top videos

    Tags: Karnataka, Marriage, Open marriage