नितीन नांदुरकर,प्रतिनिधि जळगाव : गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरां मध्ये चढ उतार पाहायला मिळत असला तरी म्हणावं तेवढं सोनं उतरताना दिसत नाही. सोन्याची झळाळी वाढतच आहे. महाराष्ट्रातील सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावमध्ये तर सोनं 56 हजारांवर पोहोचलं आहे. जळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात सराफ मार्केट आहे. तिथे सोन्याच्या दागिन्यांची आणि सोनं खरेदी विक्रीची मोठी उलाढाल होत असते. अशा ठिकाणी सोन्याचे दर आज 56 हजार 650 रुपयांवर पोहोचले आहेत. ऐन लग्नसराईत भाव गगनाला पोहोचल्याने सोनं खरेदी करणं अवघड होत चाललं आहे. दुसरीकडे चांदीचे दरही वाढताना दिसत आहेत. प्रतिकिलोमागे चांदीसाठी ग्राहकांना 70 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. ऐन लगीन सराईत सोन्याचे भाव 57 हजारापर्यंत पोहोचले असून चांदीचे भावही 70 हजार रुपये प्रति किलो झाले आहे.
तुमच्याकडे असलेले दागिने बनावट होलमार्कचे तर नाहीत?सोनं | खरेदी | विक्री |
---|---|---|
किरकोळ सोनं 999 | 53456 | 54155 |
गोल्ड RTGS 999 | 54534 | 54812 |
गोल्ड RTGS + GST 999 | 56172 | 56455 |
गोल्ड RTGS + GST आणि TCS 999 | 56238 | 56523 |
गोल्ड RTGS 999 GST AFTER TDS | 56117 | 56401 |
गोल्ड रिटेल 995 | 53670 | 53852 |
जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव 56 हजार 650 रुपये झाले आहे. तर चांदीचा भाव 70 हजार रुपये झाले आहे. जागतिक बँकेने घटवलेले व्याजदर, चायना मधील वाढता कोरोना, व डॉलरच्या किमतीचा परिणाम सोन्याच्या भाव वाढीवर झाल्याचे मत सोने तज्ञांनी व्यक्त केले आहे.
ATM मधून पैसे नाही चक्क निघतंय सोनं; विश्वास बसत नाही तर पाहा PHOTOआगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता ही सोनी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. लग्नसराईत सोनं खरेदी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आता कठीण होणार आहे. दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. नव्या वर्षापर्यंत हे भाव 57 हजारांचा पल्ला गाठणार का याची चिंता लागली आहे.