जाहिरात
मराठी बातम्या / मनी / IRCTC : आता स्वस्तात करा 5 ज्योतिर्लिंगांचे दर्शन! शिर्डी आणि शनी शिंगणापुरचाही समावेश

IRCTC : आता स्वस्तात करा 5 ज्योतिर्लिंगांचे दर्शन! शिर्डी आणि शनी शिंगणापुरचाही समावेश

आयआरसीटीसी टूर पॅकेज

आयआरसीटीसी टूर पॅकेज

IRCTC Tourism Package: भारत गौरव स्पेशल पर्यटन ट्रेन कोलकातापासून 20 मे 2023 पासून सुरु होणार आहे. ही ट्रेन पाच ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ, नागेश्वर आणि त्र्यंबकेश्वरचे दर्शन करुन देतील. ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंग सुरु आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

IRCTC Tourism Package: उन्हाळा सुरु झाला आहे. यावेळी शाळांना सुट्ट्या असतात. अशा वेळी तुम्ही फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी खास प्लान घेऊन आलो आहोत. तुम्ही धार्मिक स्थळं फिरण्याचा प्लान करत असला तर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड यूरिज्म म्हणजेच IRCTC तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे. ट्रेनने प्रवास करुन देशातील 5 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता. ही ऑफर नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊया.

भारत गौरव स्पेशल पर्यटक ट्रेन

ही ट्रेन 20 मे 2023 रोजी कोलकाता येथून सुरू होईल. ही ट्रेन ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ, नागेश्वर आणि त्र्यंबकेश्वर या पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन देईल. या ट्रेनने तुम्ही शिर्डी साई बाबा आणि शनी शिंगनापूरचेही दर्शन घेऊ शकाल. यासोबतच तुम्ही स्टॅच्यू ऑफ यूनिटीही पाहू शकता. कोलकातापासून तुम्ही प्रवास सुरु करु शकता. 12 दिवस आणि 11 रात्रीचा हा टूर आहे.

या स्टेशनवर मिळेल बोर्डिंग/ डिबोर्डिंग सुविधा

बंदेल, बर्धमान, बोलपूर, शांतिनिकेतन, रामपूर हाट, पाकूर, साहिबगंज, कहालगाव, भागलपूर, जमालपूर, किउल, बरौनी, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, हाजीपूर, पाटलीपुत्र, आराह, बक्सर, पं. दीनदयाळ उपाध्याय जं. आणि प्रयागराज छेओकी स्टेशन.

भाडं किती लागणार

या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी इकॉनॉमी क्लास (स्लीपर क्लास) वर 315 बर्थ उपलब्ध आहेत. यामध्ये प्रति व्यक्ती 20,060 रुपये भाडं असेल. नॉन एसी बजेट हॉटेलमध्ये थांबवण्याची व्यवस्था मिळेल. नॉन एसी बसची सुविधाही मिळेल. स्टँडर्ड म्हणजेच 3rd AC साठी 297 बर्थ उपलब्ध आहेत.यामध्ये प्रति व्यक्ती 31,800 रुपये भाडं आहे. एसी हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था केली जाईल. नॉन-एसी बसची सुविधा मिळेल. कंफर्ट (2nd AC) साठी 44 बर्थ उपलब्ध आहेत. प्रति व्यक्ति 41,600 रुपये भाडं आहे. एसी हॉटेलमध्ये थांबवलं जाईल आणि एसी बसची सुविधाही दिली जाईल. या सर्व पॅकेजची सुविधाही अजुनही सुरु आहे. बुकिंग सुविधा आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com वरही उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IRCTC
  • First Published :
जाहिरात
जाहिरात