नवी दिल्ली, 21 जानेवारी: वैष्णो देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू हे जात असतात. काही लोक हे त्यांच्या वाहनांमधून प्रवास करुन येथे जातात. तर काही भक्त हे बस किंवा ट्रेनचा पर्याय निवडतात. तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर ट्रेन हा पर्याय बेस्ट असतो. तुम्हाला वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुम्हाला अत्यंत कमी खर्चात हा प्रवास करता येणार आहे. कारण भारतीय रेल्वे आता यासाठी एक स्वस्त टूर पॅकेज घेऊन आले आहे. 3500 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या टूर पॅकेजमध्ये थर्ड एसी तिकीट, राहणे आणि नाश्ता यांचा समावेश आहे. श्रीशक्ती एक्स्प्रेसचा हा प्रवास 3 दिवसांचा आहे. ATM कार्ड नसले तरी तुम्ही करु शकता UPI अॅक्टिवेशन, ही आहे सोपी पद्धत हा टूर रोज संध्याकाळी नवी दिल्ली येथून सुरू होतो. प्रवासी सकाळी कटरा येथे पोहोचतात. त्यानंतर तेथे माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते कटरा येथून नवी दिल्लीला रवाना होतात. हे टूर पॅकेज संपूर्ण जानेवारी महिन्यासाठी उपलब्ध आहे आणि तुम्ही ते ऑनलाइन बुक करू शकता.
हे आहेत डिटेल्स
श्री शक्ती फुल डे दर्शन नावाच्या या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना श्री शक्ती एक्स्प्रेसच्या थर्ड एसीमध्ये प्रवास करता येणार आहे. IRCTC प्रवाशांना सकाळी नाश्ता देईल. कटरा येथे राहण्यासाठी IRCTC गेस्ट हाऊस उपलब्ध असेल. प्रवाशांना दुपारचे आणि रात्रीच्या जेवणाचे वेगळे पैसे द्यावे लागतील. हे पॅकेज बुक करण्यासाठी तुम्ही https://irctctourism.com/pacakage_description?packageCode=NDR04 या लिंकला भेट देऊ शकता. याशिवाय IRCT च्या कार्यालयातूनही बुकिंग करता येते. रेल्वेने नियमित प्रवास करता तर ‘ही’ माहिती असायलाच हवी…
एवढा लागेल खर्च
या पॅकेजच्या किमतीविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ. कंफर्ट क्लाससाठी प्रति व्यक्ती 3515 रुपये खर्च करावे लागतील. यासोबतच लहान मुलांचे भाडेही 3515 रुपये ठेवण्यात आले आहे. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठीही वेगळा बर्थ घेता येतो. या दौऱ्याची सुरुवात नवी दिल्लीपासून होणार आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला दिल्ली ते कटरा हा ट्रेनने प्रवास करावा लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी कटरा येथे पोहोचून मातेचे दर्शन घ्याल आणि तिसऱ्या दिवशी परत यावे लागेल.