मुंबई : आधार कार्ड म्हणजे आता एक प्रकारे ओळखपत्र बनलं आहे. तुमच्या सगळ्या सरकारी डॉक्युमेंटसाठी आणि ऑफिशियल अॅपसाठी आधार क्रमांक सर्वात महत्त्वाचा आहे. आता IRCTC अकाउंटला तुम्ही आधार क्रमांक लिंक केला का? नसेल तर तुम्ही आजच करून घ्या, याचं कारण म्हणजे तुम्हाला त्याचे खूप जास्त फायदे आहेत. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुलभ व्हावा यासाठी वेळोवेळी नियम बदलत असते. या पार्श्वभूमीवर रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल केला आहे. कोविड महामारीनंतर ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे रेल्वे आता आयआरसीटीसीवरून तिकीट बुक करणाऱ्यांसाठी एक खास सुविधा दिली आहे. तुम्हीही आयआरसीटीसी खातेधारक असाल आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर रेल्वेच्या या रेल्वे सुविधेचा फायदा तुम्ही घेऊ शकता, मात्र यासाठी तुम्हाला आयआरसीटीसी खात्याशी आधार लिंक करावं लागेल. आयआरसीटीसी खाते आधारसोबत कसं लिंक करायचं आणि त्याचे फायदे कोणते आहेत जाणून घ्या. जर तुम्ही आधार कार्ड लिंक केल नाही अशा ग्राहकांना रेल्वेनं खास सुविधा दिली आहे. जर आयआरसीटीसी वापरकर्त्याने आपले खाते आधारशी लिंक केले तर एका महिन्यात 24 रेल्वे तिकिटे बुक करता येतील, जर लिंक केले नाही तर त्याला केवळ 12 ट्रेनची तिकिटे बुक करता येतील. यापूर्वी आधार लिंक केल्यानंतर केवळ 12 तिकिटांचे बुकिंग आणि आधारशिवाय 6 रेल्वे तिकीटांना परवानगी देण्यात आली होती. IRCTC लिंक कसं करायचं? आयआरसीटीसी खात्याशी आधार लिंक करण्यासाठी आधी आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटवर जा. आता माय अकाउंट ऑप्शनवर जाऊन लिंक युवर आधार पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि व्हर्च्युअल आयडीची माहिती द्यावी लागेल.
आता चेकबॉक्समध्ये जाऊन सेंड ओटीपीवर क्लिक करा आणि रजिस्टर्ड मोबाइलवर ओटीपी आल्यानंतर एंटर करा. ओटीपी टाकल्यानंतर व्हेरिफाय बटणावर क्लिक करून व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. सर्व माहिती अपडेट झाल्यानंतर तुमचा आधार आयआरसीटीसी अकाऊंटशी जोडला जाईल. ईमेल आणि एसएमएसद्वारे तुम्हाला कन्फर्म केले जाईल, त्यानंतर तुम्ही IRCTC वेबसाइट किंवा अॅपवरून तिकीट बुक करू शकता