मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पत्नीच्या नावाने उघडा NPS अकाउंट; 5000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळेल आयुष्यभर पेन्शन

पत्नीच्या नावाने उघडा NPS अकाउंट; 5000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळेल आयुष्यभर पेन्शन

तुमच्यानंतरही तुमच्या पत्नीला स्वावलंबी जगता येईल आणि दर महिन्याला नियमित उत्पन्न (Regular Income) मिळू शकेल.

तुमच्यानंतरही तुमच्या पत्नीला स्वावलंबी जगता येईल आणि दर महिन्याला नियमित उत्पन्न (Regular Income) मिळू शकेल.

तुमच्यानंतरही तुमच्या पत्नीला स्वावलंबी जगता येईल आणि दर महिन्याला नियमित उत्पन्न (Regular Income) मिळू शकेल.

मुंबई, 03 जून : नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) ही योजना भविष्यातल्या गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. अनेकांना रिटायरमेंटनंतरही पैशांच्या बाबतीत कोणतीही समस्या येऊ नये असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीममध्ये (NPS) गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं. हा एक सुरक्षित पर्याय असून, यात रिटर्न्सदेखील चांगले मिळतात. एनपीएस ही योजना फक्त नोकरदारांसाठीच नाही, तर इतरांसाठीही फायदेशीर आहे. आपल्या घरातली मुलं किंवा पत्नीचं भविष्य सुरक्षित राहावं, त्यांना भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, असं वाटत असेल, तर तुम्ही एनपीएसमध्ये पत्नीच्या नावाने गुंतवणूक करू शकता. त्यामुळे तुमच्यानंतरही तुमच्या पत्नीला स्वावलंबी जगता येईल आणि दर महिन्याला नियमित उत्पन्न (Regular Income) मिळू शकेल. या संदर्भातलं वृत्त एबीपी लाइव्हने दिलं आहे.

तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) खातं उघडू शकता. हे NPS अकाउंट वयाच्या 60व्या वर्षी पत्नीला एकरकमी परतावा देईल. याशिवाय प्रत्येक महिन्याला पेन्शनचा वेगळा लाभ मिळेल. त्यामुळे तुमच्या पत्नीला मासिक पैसे मिळतील, जे तिचं नियमित उत्पन्न असेल. NPS खात्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दरमहा किती पेन्शन पाहिजे, हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. तुम्हाला सोयीनुसार दरमहा किंवा वार्षिक पैसे जमा करण्याचा पर्याय आहे. 1000 रुपयांनीही NPS खातं पत्नीच्या नावानं उघडता येतं. NPS खातं वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होतं. नवीन नियमांनुसार पत्नीचं वय 65 वर्षं होईपर्यंत NPS खातं चालू ठेवता येतं.

उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्या योजना

तुमची पत्नी 30 वर्षांची असेल आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवत असाल आणि त्या गुंतवणुकीवर दर वर्षी 10 टक्के रिटर्न मिळत असेल, तर वयाच्या 60 व्या वर्षी तिच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील. यातले 45 लाख रुपये तिला परत मिळतील. याशिवाय तिला आयुष्यभर दरमहा सुमारे 45 हजार रुपये पेन्शन मिळत राहील.

एनपीएस योजना काय आहे?

NPS ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना (Social Security Scheme) आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम प्रोफेशनल फंड मॅनेजर (Professional Fund Manager) मॅनेज करतात. केंद्र सरकार या प्रोफेशनल फंड मॅनेजर्सना ही जबाबदारी देते. त्यामुळे तुमची एनपीएसमधली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. परंतु योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर रिटर्न मिळण्याची खात्री नसते; मात्र फायनान्शिअल प्लॅनर्सच्या मते, NPS ने सुरुवातीपासून सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे.

आपल्या बायकोच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी गुंतवणूक करणं गरजेचं आहे; पण कोणतीही गुंतवणूक करताना त्याच्या अटी आणि संबंधित परताव्याबाबत नीट माहिती वाचून मगच ती गुंतवणूक करा. तसंच योजना गुंतवणुकीसाठी सुरक्षित आहे की नाही, याची खात्रीही करून घ्या.

First published: