जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Investment Tips : गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी, कधीही पैशांची अडचण जाणवणार नाही

Investment Tips : गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी, कधीही पैशांची अडचण जाणवणार नाही

Investment Tips : गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी, कधीही पैशांची अडचण जाणवणार नाही

गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे पुरेशा हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स (Life Insurance) पॉलिसीज असल्याची खात्री करा. हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance) नसेल तर आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतील पैसे वापरावे लागतील.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 28 फेब्रुवारी : पैशांची बचत (Saving) आणि गुंतवणूक (Investment) ही काळाची गरज आहे. त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही फक्त अशाच पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी, जे कमी जोखमीसह (Risk) जास्त परतावा (Returns) देतात. काहीवेळा लोक जास्त परतावा मिळवण्यासाठी मोठी जोखीम पत्करण्यास तयार असतात. मात्र, त्यासाठीदेखील योग्य प्लॅनिंगची (Investment Planning) आवश्यकता आहे. गुंतवणूक सल्लागारांचं (Investment Advisor) म्हणणं आहे की, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितकं चांगलं आहे. पण, त्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अनेक गुंतवणूकदार कोणत्याही प्लॅनिंगशिवाय गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. कोणत्याही प्रकारचं नुकसान टाळण्यासाठी, तुमच्याकडे योग्य गुंतवणूक धोरण (Investment Plan) असावं. म्हणूनच लोकांनी गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. घराचं बजेट निश्चित करा गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबाचं एकूण उत्पन्न (Income) किती आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुमच्या कुटुंबाचा खर्च किती आहे, याचाही हिशेब केला पाहिजे. जोडीदाराच्या उत्पन्नाबरोबरच विविध स्रोतांतून मिळणारं उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा हिशेब करा. मासिक किंवा त्रैमासिक काळाच्या आधारावर तुम्ही हा हिशेब करू शकता. या आधारावर तुम्ही तुमचं बजेट (Budget) निश्चित करा. Personal Loan मुदतीआधी बंद करायचं आहे का? किती दंड लागतो आणि क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो? चेक करा खर्चाचा पॅटर्न समजून घेणं गरजेचं कमाईसोबतच तुमचा खर्च करण्याची पद्धत (Cost Pattern) समजून घेणंही महत्त्वाचं आहे. यासह, तुम्ही तुमचे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म फायनॅन्शियल गोल्स पूर्ण करण्यासाठी बचत योजना तयार करू शकता. नवीन कार खरेदी करणं असो किंवा मग तुमच्या मुलांचं शिक्षण पूर्ण करणं असो, अशा अनेक गोल्सचा समावेश तुम्ही बचत योजनेमध्ये करू शकता. आपल्या कमाईतील काही रक्कमेची अगोदर बचत करावी आणि नंतर उर्वरित रक्कम घरखर्चासाठी वापरावी, हा नियम प्रत्येकानं लक्षात ठेवला पाहिजे. LIC IPO: पॉलिसीधारकांना आयपीओसाठी पॅन अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस; चेक करा प्रोसेस कर्जाची लवकर परतफेड करा जर तुम्ही एखाद्या कर्जावर (Loan) व्याज देत असाल, तर गुंतवणुकीतून होणारी तुमची कमाई शून्य असेल. त्यामुळे तुमच्या नावावर गृहकर्ज, कार लोन यांसारखी कर्जं असतील तर ती लवकरात लवकर फेडा. खूप जास्त कर्ज तुमच्यावर आर्थिक भार टाकू शकतं. हेल्थ क्रेडिट प्रोफाइल असल्‍यानं दीर्घ कालावधीसाठी चांगला क्रेडिट स्कोअर (Credit Score) राखण्‍यात मदत होते. साधारणपणे, एकूण ईएमआय (EMI) पेमेंट तुमच्या पगाराच्या 45 ते 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावं. हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स नक्की घ्या गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे पुरेशा हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स (Life Insurance) पॉलिसीज असल्याची खात्री करा. हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance) नसेल तर आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतील पैसे वापरावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचं आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येणार नाही. इमर्जन्सी फंड तयार ठेवा तुमची गुंतवणूक प्रक्रिया सोपी करण्यासाठी, आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार करा. कधी-कधी अशी काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवते की काम चालू ठेवणं आपल्यासाठी कठीण होऊन बसतं. काही महिन्यांसाठी नोकरीही जाऊ शकते. अशा परिस्थितीसाठी आगाऊ तयारी करणं आवश्यक आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत, जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल, तर तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल. इमर्जन्सी फंडची कधीही गरज लागू शकते. त्यामुळे इमर्जन्सी फंडसाठी अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथून आणीबाणीच्या परिस्थितीत तो काढणं सोपं असेल. फायनॅन्शियल गोल निश्चित करा गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे (Financial Goals) निश्चित केली पाहिजेत. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय मिळवायचं आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या आधारावर, तुम्हाला किती आणि कुठे गुंतवणूक करायची आहे हे ठरवावं. आर्थिक उद्दिष्टे ठरवताना महागाईदेखील लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे फायनॅन्शियल गोल्स साध्य करू शकता. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन तुम्ही गुंतवणूक केल्यास केव्हाही संकट आल्यास तुमची आर्थिक बाजू भक्कम राहू शकते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात