जाहिरात
मराठी बातम्या / मनी / FD वर कसं मिळवायचं जास्त व्याज, 'ही' बँक देतेय खास सुविधा

FD वर कसं मिळवायचं जास्त व्याज, 'ही' बँक देतेय खास सुविधा

FD वर कसं मिळवायचं जास्त व्याज, 'ही' बँक देतेय खास सुविधा

मे 2022पासून आरबीआयने रेपो दरात विक्रमी वाढ केल्यानंतर बँकांनी बचत खात्यावरच्या व्याजदरात किरकोळ वाढ केली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई: भविष्यातल्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यात आणि आर्थिक आणीबाणीच्या काळात मदत होण्यासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. विविध ठिकाणी गुंतवणूक करूनही संपत्तीमध्ये योग्य मार्गाने वाढ करणं शक्य आहे. रोख रकमेच्या गुंतवणुकीचा विचार केल्यास बँकांमधल्या विविध प्रकारच्या योजनांमध्ये पैसे ठेवता येतात. त्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या माध्यमातून आपल्याला अतिरिक्त पैसे मिळू शकतात. मे 2022पासून आरबीआयने रेपो दरात विक्रमी वाढ केल्यानंतर बँकांनी बचत खात्यावरच्या व्याजदरात किरकोळ वाढ केली आहे. त्या तुलनेत बँकेतल्या कर्जांवरचा व्याजदर अनेक पटींनी वाढला आहे. याशिवाय फिक्स्ड डिपॉझिटचं (एफडी) व्याजही अनेक पटींनी वाढलं आहे. काही बँका फिक्स्ड डिपॉझिटवर 9.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये केलेली गुंतवणूक जास्त फायद्याची ठरू शकते. ‘एबीपी लाइव्ह’ने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    आता FD वरही करता येणार जबदरस्त कमाई! ‘या’ बँका देताय 9.50% व्याज

    बँकेतल्या बचत खात्यातल्या ठेवींवर दोन ते चार टक्के व्याज दिलं जात आहे. एफडीवरचे व्याजदर तीन ते आठ टक्के आहेत. स्मॉल फायनान्स बँका एफडीवर गुंतवणूकदारांना 3.50 टक्के ते 9.5 टक्के व्याज देत आहेत. आर्थिक तज्ज्ञ शिफारस करतात, की बचत खात्याच्या तुलनेत जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल, तर एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. देशातल्या प्रमुख बँका एफडीवर सुमारे आठ टक्के व्याज देत आहेत. एफडीमध्ये पैसे जमा करण्यापूर्वी बँकेची विश्वासार्हता आणि बाजारात उपलब्ध असलेल्या इतर एफडीचे व्याज यांची तुलना केली पाहिजे.

    EPFO वर मोठा निर्णय! हायर पेन्शन घेणाऱ्यांसाठी सरकारने दिली गुडन्यूज

    ‘या’ बँका बचत खात्यावर देतात 7.25 टक्के व्याज आरबीएल बँक, डीसीबी बँक, बंधन बँक यांसारख्या खासगी क्षेत्रातल्या काही बँका आणि इक्विटास एसएफबी, उज्जीवन एसएफबीसारख्या छोट्या बँका 25 लाखांपर्यंतच्या बचतीवर वार्षिक 7.25 टक्के व्याज देत आहेत. या बँकांचं रेटिंग देशातील प्रमुख बँकांच्या तुलनेत कमी आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    याशिवाय, आरबीआय बाँडमध्येही गुंतवणूक केली जाऊ शकते. तिथे 7.25 टक्के व्याजदर मिळतो. थोडीशी जोखीम पत्करून जास्त गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंडाचाही पर्याय आहे. तिथे तुम्ही टॅक्स सेव्हिंग फंडपासून ते स्मॉल कॅप टू चार्ज कॅपपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्यामध्ये तुम्हाला वर्षाला 12 ते 20 टक्के किंवा त्याहून अधिक दरानं व्याज मिळू शकतं. तुम्ही एसआयपीद्वारेही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात