जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Sukanya Samriddhi Scheme मध्ये 5 मोठे बदल; गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेणं महत्त्वाचं

Sukanya Samriddhi Scheme मध्ये 5 मोठे बदल; गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेणं महत्त्वाचं

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजनेत आता केंद्र सरकारने 5 मोठे बदल केले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींना याचा फायदा घेता येणार आहे. '

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 12 फेब्रुवारी: मुलींच्या जन्माला, शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं, मुलींचं (Girl Child) भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावं या उद्देशानं केंद्र सरकारनं सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme) सुरू केली आहे. बँका, तसंच पोस्ट खात्याद्वारे चालवण्यात येणारी ही उत्तम व्याजदर आणि सुरक्षितता देणारी दीर्घकालीन अल्पबचत गुंतवणूक योजना आहे. पोस्टात किंवा राष्ट्रीयीकृत बँकेत हे खातं उघडता येतं. आतापर्यंत लाखो पालकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे. यात मुलीच्या जन्मापासून ठराविक रक्कम नियमितपणे गुंतवल्यास वयाच्या 21 व्या वर्षी तिला एक कोटी रुपये मिळू शकतात. अशा या योजनेत आता केंद्र सरकारने 5 मोठे बदल केले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींना याचा फायदा घेता येणार आहे. ’ सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करून मुलीच्या शिक्षणासाठी आणि अन्य खर्चासाठी तरतूद करता येते, तेही अगदी अल्प गुंतवणूकीत. तुम्ही या योजनेत दररोज 416 रुपयांची बचत केल्यास मुदतपूर्तीनंतर 65 लाख रुपयांची मोठी रक्कम तयार होईल. आता या योजनेतल्या नवीन नियमांमुळे आणखी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हे वाचा- ‘हा’ शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म आता ShareChat च्या मालकीचा; 60 कोटी डॉलर्सचा करार तीन मुलींचं खातं उघडण्याची सोय आता या योजनेत तिसऱ्या मुलीचंही (Third Girl Child) खातं उघडता येणार आहे. एका मुलीच्या जन्मानंतर दोन जुळ्या मुली (Twins) असतील, तर त्या सर्वांचं खातं उघडता येते. नव्या नियमांनुसार दोनपेक्षा जास्त मुलींचं खातं उघडायचं असेल तर जन्म दाखल्यासोबत प्रतिज्ञापत्रही सादर करावं लागणार आहे. जुन्या नियमांमध्ये, पालकांना फक्त वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक होते. 80C अंतर्गत करसवलतीचा लाभही फक्त दोन मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता. तिसऱ्या मुलीच्या खात्यावर हा लाभ मिळत नव्हता. डीफॉल्ट खात्यालाही आता योजनेचाच व्याजदर या खात्यात वर्षाला किमान 250 रुपये जमा करणं आवश्यक आहे. ही रक्कम जमा न केल्यास खातं डीफॉल्ट (Default Account) मानलं जातं. परंतु नवीन नियमांनुसार, खातं पुन्हा नियमित न केल्यास, मुदत संपेपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज दिलं जाईल. पूर्वी, डीफॉल्ट खात्यासाठी बचत खात्याच्या व्याजदरानं व्याज दिलं जात होतं. हे वाचा- फक्त 50 हजार रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होईल लाखोंचा नफा मुदतीपूर्वी खातं बंद करण्याची परवानगी जिच्या नावावर खातं आहे त्या मुलीचा मृत्यू झाल्यास (Death Account Holder Girl) किंवा तिचा राहण्याचा पत्ता बदलला (Address change) तरच हे खाते मुदतीआधी बंद करण्याची (Closure before Term Completion) सुविधा देण्यात आली होती. आता नव्या नियमानुसार, मुलीचा मृत्यू झाल्यास किंवा तिला एखादा गंभीर आजार झाला असेल, तसंच पालकाचा मृत्यू झाल्यासही खातं मुदतीपूर्वी बंद करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तिला खातं चालवण्याची परवानगी नाही नवीन नियमांनुसार, मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तिला खातं चालवण्याची परवानगी दिली जाणार नाही. जुन्या नियमांमध्ये, 10 वर्षांत हे करण्याची परवानगी होती. आता मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत पालकच खातं चालवतील. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर, खातं उघडलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत आवश्यक कागदपत्रं जमा करावी लागतील. त्यानंतर मुलीला हे खातं चालवता येईल. हे वाचा- ड्रोन निर्मिती करणाऱ्या ‘या’ कंपन्यांचे शेअर वधारणार? तुमच्याकडे आहेत का? चुकीचं व्याज परत करण्याची तरतूद रद्द या बदलांव्यतिरिक्त, सुकन्या समृद्धी योजनेच्या नवीन नियमांमध्ये काही तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. नवीन नियमांमध्ये खात्यातलं चुकीचं व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. खात्यातलं व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा करण्याची तरतूद नव्यानं करण्यात आली आहे. या बदलांमुळे अनेक पालकांना लाभ होणार असून, जास्तीत जास्त जण यात गुंतवणूक करू शकणार आहेत. त्यामुळे मुलींचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात