मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Investment Tips: आर्थिक स्थैर्यासाठी टाळा अनावश्यक खर्च, या टिप्स तुम्हाला मदत करतील

Investment Tips: आर्थिक स्थैर्यासाठी टाळा अनावश्यक खर्च, या टिप्स तुम्हाला मदत करतील

Investment Tips: ‘या’ 4 सवयी तुम्हाला करतील कंगाल, वेळीच व्हा सावध

Investment Tips: ‘या’ 4 सवयी तुम्हाला करतील कंगाल, वेळीच व्हा सावध

Investment and Money Managent Tips: अनावश्यक खर्च काय असतो आणि त्यामुळं तुमच्या खिशातून पैसे कसे वाया जातात, हे लोकांना कळायला हवं. वायफळ खर्च कमी झाला तर आपोआप आर्थिक स्थैर्य मिळू शकतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 4 सप्टेंबर: आज वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्यांची बचत शून्य झाली आहे. त्याचबरोबर खर्च चालवण्यासाठी काही लोकांना ठेवी मोडाव्या लागतात. फक्त महागाईमुळेच लोकांचं आर्थिक गणित बिघडलं असतानाच काही लोकांच्या स्वत:च्या सवयीही त्यांच्या आर्थिक अडचणींसाठी कारणीभूत असतात. वास्तविक अनेक वेळा लोक कमी उत्पन्न असताना खर्चाचा विचार करत नाहीत आणि जी बचत ते करू शकतात, ते अनावश्यक खर्चात वाया  (How to avoid unnecessary expenses?) घालवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच अनावश्यक खर्चांबद्दल सांगत आहोत. हे खर्च दिसायला जरी लहान असले, तरी तुम्ही त्या सर्वांना एकत्र आणता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की, तुम्ही तुमच्या कमाईचा बराचसा भाग यावर वाया घालवला आहे. या खर्चावर नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं (Saving Tips) आहे. या खर्चावर नियंत्रण ठेवणं म्हणजे असे खर्च बंद करणं असं नाही, तर त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं होय. हे खर्च काय आहेत ते जाणून घेऊया.

विमा पॉलिसीसाठी जास्त पैसे देणे-

ही अशी जागा आहे जिथे लोकांना आपण जास्त पैसे देत आहोत याची जाणीवही नसते. खरेतर, आजारपण, अपघात यासारखे विषय पॉलिसीमध्ये जोडले जातात तेव्हा लोक त्यांच्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त कव्हर घेण्याचा प्रयत्न करतात. आणि लोक कधीकधी मार्केटिंगच्या नौटंकीला बळी पडतात. विमा पॉलिसीमधील पैसे क्लेम न केल्यास ते परत केले जात नाही. हे सुरक्षितता प्रदान करते, हे जरी खरं असलं तरी ते गुंतवणुकीचा पर्याय नाही. त्यासाठी पॉलिसी समजून घेणं गरजेचं आहे. विमा घेताना नेहमी तुमच्या गरजा पहा आणि प्रीमियम शक्य तितका कमी ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला तो वर्षानुवर्षे चालवावा लागतो, त्यामुळं तुम्हाला तो परवडणारा ठेवण्याची गरज आहे. त्याचवेळी अनेक वेळा लोक आवश्यकतेपेक्षा जास्त पॉलिसी घेतात. विमा घेताना एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या, जर तुम्ही प्रीमियम कमी ठेवू शकला, तर तुमच्या खिशासाठी तर चांगले होईलच पण पॉलिसी सांभाळणं तुमच्यासाठी कठीण होणार नाही.

क्रेडिट कार्ड विचार न करता वापर-

लोक पैसे कमी पडल्यास क्रेडिट कार्ड वापरतात आणि अनेक वेळा क्रेडिट कार्डच्या बिलांमुळे ते अधिक अडचणीत येतात. तज्ज्ञांचं मत आहे की, खिशावरचा भार जसजसा वाढत जाईल, तसतसे काही काळ क्रेडिट कार्डचा वापर पूर्णपणे बंद करणं योग्य ठरेल. क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी, कार्डच्या अटी व शर्ती, त्यावर आकारलं जाणारं व्याज प्रक्रिया शुल्क इत्यादींची माहिती घ्या. अहवालानुसार, क्रेडिट कार्ड तुम्हाला अधिक खर्च करण्यास प्रवृत्त करतात, त्यामुळं भविष्यातील उत्पन्नाची अनिश्चितता असल्यास किंवा वाढत्या खर्चाची शक्यता असल्यावर क्रेडिट कार्डचा वापर टाळावा.

हेही वाचा- SBI नं लाँच केलं अनोखं क्रेडिट कार्ड, खरेदीवर मिळेल मोठा कॅशबॅक

तुम्ही वापरत नसलेली सबस्क्रिप्शन-

आजकाल प्रत्येकाकडे दोन ते तीन सबस्क्रिप्शन असतात. OTT असो, कोणतीही मेंटेनन्स सेवा असो किंवा रेस्टॉरंट असो, लोक चांगल्या ऑफरसाठी दरमहा किंवा वार्षिक काही पैसे द्यायला तयार असतात. ही सदस्यता महिन्याला शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत असू शकते. सेवेसाठी पैसे देण्याचं ओझं फारसं नसतं, तथापि जेव्हा सब्सक्रिप्शनची संख्या वाढते तेव्हा त्याचा खिशावर परिणाम दिसून येतो. गेल्या वर्षी केलेल्या एका केस स्टडीनुसार, 70 टक्के ग्राहक सातत्यानं अशा सबस्क्रिप्शनवर पैसे खर्च करतात ज्याचा ते कमी किंवा कोणताही फायदा घेतात. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या सर्व सबस्क्रिप्शन आणि मोबाईल सेवांच्या बिलाचं पुनरावलोकन करणं आणि तुम्ही बऱ्याच काळापासून वापरल्या नसलेल्या अशा सर्व सेवा बंद करणं महत्वाचं आहे, यामुळे तुमचं बजेट सुधारेल.

काय होईल फायदा?

हे सर्व खर्च लहान वाटतात, परंतु जर हे सर्व खर्च मर्यादित केले तर दर महिन्याला तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकता. एसआयपी दरमहा रु 500 पासून सुरू होऊ शकते. अशा स्मार्ट स्टेप्समुळे तुम्ही त्याच पैशात चांगले परतावा मिळवू शकाल.

First published:

Tags: Credit card, Investment, Money, Savings and investments