मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Investment Tips: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय? मग ही बातमी एकदा वाचाच

Investment Tips: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय? मग ही बातमी एकदा वाचाच

 जेव्हा तुम्ही पैसे  गुंतवता, तेव्हा तुम्हाला त्यावर जास्तीत जास्त रिटर्न हवे असतात. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त असते; पण त्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं सर्वांत महत्त्वाचं असतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

 मुंबई, 27 ऑगस्ट-   जेव्हा तुम्ही पैसे  गुंतवता, तेव्हा तुम्हाला त्यावर जास्तीत जास्त रिटर्न हवे असतात. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त असते; पण त्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं सर्वांत महत्त्वाचं असतं. अन्यथा गुंतवणुकीचा निर्णय चुकला, तर पैसेदेखील अडकून पडतात. आजकाल म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल वाढतोय. तुम्हीही योग्य म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर तुम्हालासुद्धा चांगले रिटर्न मिळू शकतात.

देशातली सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) म्युच्युअल फंड सेक्टरमध्ये चांगलं नाव कमावलं आहे. ‘एसबीआय म्युच्युअल फंड योजना’ या नावाची या सरकारी बँकेची योजना आहे. या अंतर्गतच ‘स्मॉल कॅप म्युच्युअल फंड’, ‘मीडियम कॅप म्युच्युअल फंड’ आणि ‘लार्ज कॅप म्युच्युअल फंड’ यांसारख्या योजना एसबीआय चालवते. रिटर्नच्या बाबतीत बोलायचं झालं, तर या बाबतीत अनेक एसबीआय फंड चांगले असल्याचे सिद्ध झालंय.

मोठ्या प्रमाणात मिळाले रिटर्न

एसबीआयचे असे अनेक म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना 9 पट रिटर्न्स दिलेत. तुम्ही अशा कोणत्याही योजनेत एसआयपी (SIP) केली असेल तर मग विचारालायच नको. एसआयपीद्वारे गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळतो. चला तर, आम्ही आज तुम्हाला चांगल्या रिटर्न्स देणाऱ्या अशा योजनेची माहिती देत आहोत.

एसबीआय स्मॉल कॅप फंड

गुड रिटर्न्सच्या रिसर्चनुसार, एसबीआय स्मॉल कॅप फंडाने गेल्या 10 वर्षांत 25 टक्के सीएजीआर रिटर्न दिलाय. तुम्ही या फंडात 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 9 लाख रुपयांचे रिटर्न्स मिळतील. तसंच ज्यांनी या फंडात एसआयपी सुरू केली, त्यांनी कमी गुंतवणुकीत लाखो रुपयांचा फंड बनवला आहे.

(हे वाचा: एक ना दोन कमी वयात श्रीमंत होण्याचे 5 मार्ग; वयाच्या तिशीतच व्हाल लखपती )

500 रुपयांनी सुरू करता येते एसआयपी

एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात किमान 500 रुपयांपासून आणि एकाच वेळी 5 हजार रुपयांपर्यंत एसआयपी सुरू करता येते. एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाने 10 वर्षांत गुंतवणूकदारांना 18 टक्के सीएजीआर रिटर्न दिला आहे. ज्यांनी या फंडात 1 लाख रुपये गुंतवले आहेत, त्यांची ठेव रक्कम 5.28 लाख रुपये झाली आहे. यासह, ज्यांनी दरमहा 5000 रुपये एसआयपी केली, त्यांची गुंतवणूक 15.5 लाख रुपये झाली.दरम्यान, गेल्या काही काळापासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत चालला आहे; मात्र ही गुंतवणूक करताना योग्य फंड निवडणं तेवढंच महत्त्वाचं आहे.

First published:

Tags: Bank services, Money, Mutual Funds