मुंबई, 21 मार्च : आजकाल अनेक सुशिक्षित लोकांचा शेती (farming) करण्याकडे कल वाढत आहे. सुशिक्षीत तरुण चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून शेती करण्याला प्राधान्य देत आहेत. जर तुम्हालाही कमी वेळेत कोट्याधीश व्हायचं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खूप चांगली आयडिया (idea) घेऊन आलो आहोत. ही आयडिया वापरल्यास तुम्ही फक्त 5 वर्षांत श्रीमंत (rich) बनू शकता. तुम्ही मलबार कडुलिंबाची शेती (Malabar Neem Farming करू शकता. तुम्ही या कडुलिंबाची झाडं लावल्यानंतर इतर पिकं घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही कमी जमिनीत उत्पादन आणि नफा जास्त मिळवू शकाल. मलबार कडूलिंब किंवा मेलिया डबिया या झाडाला अनेक नावांनी ओळखलं जातं. मेलियासी वनस्पती कुटुंबातून जन्मलेलं मलबार कडूलिंब निलगिरीप्रमाणे वेगाने वाढतं. त्याची रोपं लावल्यानंतर 2 वर्षांत 40 फूट उंचीपर्यंत वाढतात. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या झाडाची लागवड करत आहेत. ही झाडं कशी लावायची मलबार कडुलिंबाचं झाड सामान्य कडुलिंबापेक्षा थोडं वेगळं आहे. सर्व प्रकारच्या जमिनींत याची लागवड सहज करता येते. यासाठी जास्त पाणी लागत नाही, कमी पाण्यात ही झाडं चांगली वाढू शकतात. मार्च आणि एप्रिल महिन्यात ही झाडं लावणं चांगलं मानलं जातं. महत्वाचं म्हणजे सर्व प्रकारच्या जमिनीत या झाडाची वाढ चांगली होते. 4 एकरांत मलबार कडुलिंबाची 5000 झाडं लावता येतात. यापैकी शेताच्या बांधावर 2000 आणि शेताच्या आतमध्ये 3000 झाडं लावता येतील. अवघ्या पाच वर्षांत या झाडापासून लाकूड मिळते. झाड एका वर्षात 8 फूट उंच वाढते. या झाडांमध्ये कीड लागत नाही, त्यामुळे त्याची मागणी जास्त आहे. मलबार कडुलिंबाचं लाकूड प्लायवूड उद्योगासाठी (Plywood Industry) सर्वांत उत्कृष्ट मानलं जातं, तसेच ते टिकाऊदेखील असतं. तुमची कमाई होणार मलबार कडुलिंबाचे लाकूड तुम्ही 8 वर्षांनंतर विकू शकता. 4 एकरात याची लागवड करून तुम्ही 50 लाख रुपये सहज कमवू शकता. एका झाडाचे वजन दीड ते दोन टन असते. किमान 500 रुपये क्विंटल किमतीने हे लाकूड बाजारात विकलं जातं. म्हणजेच एक रोप 6000-7000 रुपयांना विकले तरी पाच हजार झाडांपासून शेतकऱ्यांना लाखो रुपये सहज मिळू शकतात. तुमच्याकडे शेती असेल आणि काहीतरी वेगळा प्रयोग करण्याच्या विचारात असाल तर मलबार कडुलिंबाच्या शेतीचं संपूर्ण गणित समजून घेत त्याची लागवड करायला हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







